Tuesday , December 9 2025
Breaking News

कर्नाटक

बंगळुर – मुंबई दरम्यान सुपरफास्ट ट्रेनला मंजुरी – खासदार सुर्या

  बंगळूर : केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने बंगळुर आणि मुंबई दरम्यान एक नवीन सुपरफास्ट ट्रेन मंजूर केली आहे, अशी माहिती खासदार तेजस्वी सूर्या यांनी दिली. या मंजुरीमुळे दोन्ही शहरांमधील नागरिकांची ३० वर्षांची जुनी मागणी पूर्ण झाली आहे. तेजस्वी यांनी स्पष्ट केले की, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली आहे …

Read More »

काँग्रेस सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला दुप्पट

  कंत्राटदार संघटनेची तक्रार; मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र बंगळूर : सत्ताधारी काँग्रेसच्या काळात अनेक विभागांमध्ये भ्रष्टाचार मागील भाजप राजवटीच्या तुलनेत “दुप्पट” झाला असल्याची लेखी तक्रार कर्नाटक राज्य कंत्राटदार संघटनेने (केएससीए) केली आहे, हा एक खळबळजनक आरोप आहे, जो मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारसाठी धक्का ठरू शकतो. कंत्राटदार संघटनेने २५ सप्टेंबर रोजी सिद्धरामय्या …

Read More »

अतिवृष्टीने बाधित भागात ओला दुष्काळ जाहीर करा

  रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार ; कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांची बैठक निपाणी (वार्ता) : निपाणी शहर चिक्कोडी विभागात दोन दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. बहुतांश ठिकाणी जमिनी खरडून गेल्या आहेत. सततच्या पावसामुळे सोयाबीन, उडीद, मका, मिरची, भाजीपाला पिकासह इतर पिके पूर्ण वाया गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसगने …

Read More »

जातीय जनगणना: सर्वेक्षण अंतिम मुदतीपर्यंत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

  जिल्हाधिकारी, जि. प. मुख्यसचिवांशी साधला संवाद बंगळूर : सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणा (जातीय जनगणना) वर परिणाम करणाऱ्या तांत्रिक समस्या जवळजवळ पूर्णपणे सोडवल्या गेल्या आहेत. आता सर्वेक्षण पूर्ण क्षमतेने पुढे जाईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी सांगितले. त्यांनी असे प्रतिपादन केले की सर्वेक्षण निर्धारित कालावधीत पूर्ण केले जाईल आणि त्यासाठी …

Read More »

संधींचा वापर करून विद्यार्थ्यांनी भविष्य घडवावे

  श्रीशैल यडहळ्ळी ; बागेवाडी महाविद्यालयात राज्यस्तरीय कार्यशाळा निपाणी (वार्ता) : आजच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोर असलेल्या संधींचा वापर करून भविष्य घडवावे, असे आवाहन राज्य सहकार विभागाचे जिल्हा प्रशिक्षण अधिकारी श्रीशैल यडहळ्ळीज् यांनी केले. बेळगाव येथील केएलई संस्थेच्या येथील जी. आय. बागेवाडी महा विद्यालयात अर्थशास्त्र आणि वाणिज्य विभागातर्फे आयोजित ‘भारतीय बँकिंग आणि …

Read More »

महामार्गाच्या रुंदीकरणासाठी बांधकाम पाडण्याचे काम युद्ध पातळीवर

  वाहतूक वळविली सेवा रस्त्यावरून; खरी कॉर्नर जवळ भुयारी मार्गाची मागणी निपाणी (वार्ता) : पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे जोरदारपणे सुरू झाले आहे. सध्या शहराबाहेरील खरी कॉर्नर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून घरे, दुकाने आणि व्यापारी संकुलाचे बांधकाम पाडले जात आहे. त्यामुळे सेवा रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यामुळे कोंडी …

Read More »

सरपंच चषक मोदगे येथे भव्य बैलगाडा पळवण्याची जंगी शर्यत

  दड्डी : सरपंच चषक फौंडेशन, मोदगे, ता. हुक्केरी, जि. बेळगाव येथे भव्य बैलगाडा पळवण्याची जंगी शर्यत शनिवार दि. २७ सप्टेंबर २०२५ ते रविवार २८ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित केली आहे. तरी हौशी आजरा, चंदगड, गडहिंग्लज, भुदरगड, राधानगरी, कर्नाटक बैलगाडा मालकांनी याचा लाभ घ्यावा, ही विनंती. पुढील प्रमाणे बक्षीसे अशी …

Read More »

सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षणास वेग देण्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे निर्देश

  बंगळुरू : राज्यभर सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षण सुरू झालं असून, प्रारंभी काही तांत्रिक अडचणींमुळे या कामात विलंब झाला. आता त्या सर्व अडचणी दूर करण्यात आल्या असून, सर्वेक्षणाच्या गतीस चालना द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कृष्णा येथील व्हिडीओ कॉन्फरन्समधून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. १.४३ कोटी कुटुंबांचं सर्वेक्षण हे ऑक्टोबर ७ पर्यंत …

Read More »

सर्वेक्षण कर्तव्यास उपस्थित न रहाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई : एच. के. पाटील

  बंगळूर : कर्नाटक राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण कामात नियुक्त केलेले अधिकारी किंवा कर्मचारी सर्वेक्षण कामाला उपस्थित न राहिल्यास आणि त्यांची कर्तव्ये पार न पाडल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे कायदा, न्याय, मानवाधिकार, संसदीय व्यवहार आणि कायदे आणि पर्यटन मंत्री एच. के. पाटील यांनी सांगितले. …

Read More »

डॉ. आंबेडकर वाचनालय हस्तांतरणसह सुविधांसाठी प्रयत्नशील

  नगराध्यक्षा सोनल कोठडीया; निपाणी नगरपालिकेती बैठकीत निर्णय निपाणी (वार्ता) : निपाणी येथील डॉ. आंबेडकर विचार मंच व विविध संघटनेच्या वतीने सात वर्षांपूर्वी आंदोलन करून मिळवलेले वाचनालय केवळ तांत्रिक अडचणीमुळे आजतागायत रखडलेले होते. ते पूर्ण करून सुसज्ज ग्रंथालय निर्माण करू असे आश्वासन नगराध्यक्षक्षा सोनल कोठाडीया यांनी दिले. येथील नगरपालिकेमधील दिवंगत …

Read More »