Tuesday , May 26 2026
Breaking News

कर्नाटक

‘बजरंग बली की जय’च्या जयघोषाने निपाणी दणाणली

  दुपारपर्यंत भाविकांची गर्दी ; पाळणासह सुंठवडा वाटप निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरात गुरुवारी (ता.२) विविध ठिकाणी हनुमान जयंती झाली. त्यानिमित्त सकाळपासूनच मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. सर्वत्र ‘बजरंग बली की जय’ चा जयघोष सुरू होता. यावेळी महिलांनी पाळणा सादर केल्यावर सुंठवडा वाटप करण्यात आले. येथील साखरवाडीतील …

Read More »

वळीवाच्या दमदार सलामीने घरांचे छत उडून तंबाखूसह ज्वारीचे चार लाखाचे नुकसान

  निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील वळीवाने गुरुवारी (ता.२) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दमदार सलामी दिली. या पहिल्या पावसातच सर्वांची रेघा त्रिपीट उडाली. अचानक आलेल्या या वळीव आणि वादळी वाऱ्यामुळे येथील केसरकर मळातील दोन घरांचे छत उडाल्याने घरातील तंबाखू, ज्वारी आणि कडबाकुट्टीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे केसरकर कुटुंबीय अडचणीत …

Read More »

नागरिकांच्या सतर्कतेमुळे बोरगावमध्ये चोरीचा डाव फसला; दोघा चोरट्यांना पकडण्यात यश

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील टेक्स्टाईल पार्कमध्ये चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांची चाहूल लागताच नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा डाव अयशस्वी झाला. सागर माने यांच्या कारखान्यात चोरी करत असताना दोघा संशयितांना नागरिकांनी रंगेहाथ पकडले असून तिघेजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. फैयाज कोलार व तोहिद मुजावर (रा. कबनूर, इचलकरंजी) अशी त्यांची नावे …

Read More »

सौंदलगा येथे येणाऱ्या प्रमुख वक्त्यावर बंदी घाला

  ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी; तहसीलदार कार्यालयाला निवेदन निपाणी (वार्ता) : सौंदलगा येथे होत असलेल्या हिंदू संमेलनासाठी प्रमुख वक्ते म्हणून मिलिंद एकबोटे हे उपस्थित राहणार आहेत. भीमा कोरेगाव दंगलीतील प्रमुख आरोपी असून त्यांची वक्तव्ये दलित हिंदू,- मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करणे, सामाजिक सलोखा बिघडवणे, संविधान विरोधी आणि जातीय दंगली …

Read More »

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना तीन वर्षे कारावास

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. भुरणकी गावातील दोन आरोपींना दोषी ठरवत पोक्सो न्यायालयाने कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. खानापूर तालुक्यातील नंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भुरणकी गावामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणाची …

Read More »

आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रकाच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा पलटवार; खुल्या चर्चेचे आव्हान

  बंगळूर : राज्य सरकारच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रक जाहीर करण्याची मागणी करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आर्थिक विषयातील अज्ञान, प्रशासनाचा अनुभवाचा अभाव आणि राजकीय हताशता याचेच हे लक्षण असल्याची टीका करत त्यांनी या विषयावर खुल्या चर्चेसाठी आपण तयार असल्याचे आव्हान दिले. …

Read More »

शिवकुमार स्वामी म्हणजे समाजाच्या आत्म्याला आकार देणारे संत

  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू; ११९ व्या जयंतीनिमित्त गुरुवंदना कार्यक्रम बंगळूर : शिवकुमार स्वामींसारखे संत समाज आणि राष्ट्राच्या आत्म्याला आकार देतात आणि त्यांच्या देहावसानानंतरही त्यांची आध्यात्मिक परंपरा देशाला सतत पोषण देत राहते, असे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी सांगितले. सिद्धगंगा मठाचे प्रमुख असलेले शिवकुमारस्वामी यांना ‘त्रिविध दासोही’ म्हणून ओळखले जात होते. अन्न, …

Read More »

ऊसतोड कामगारांची उचल फिटलीच नाही

  यंत्रापुढे हतबल; मुकादम, वाहन मालक आले अडचणीत निपाणी (वार्ता) : काही वर्षांपूर्वी उसाच्या फडात कोयत्याचा खणखणाट आणि मजुरांच्या मुलाबाळांचा किलबिलाट महिनोनमहिने ऐकू येत होता. पण काळ बदललि असून आता ऊसतोडणी यंत्रांचा (हार्वेस्टर) धडधडाट वाढला आहे. ज्या कामाला मजुरांची अख्खी टोळी तीन-चार दिवस लावायची, ते काम आता अवघ्या पाच तासांत …

Read More »

विविध ऑलंपियाड परीक्षेमध्ये मोहनलाल दोशी विद्यालयाचे यश

  निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गणित, इंग्लिश, हिंदी ऑलम्पियाड परीक्षेत यशसंपादन केले आहे. त्यामध्ये गणित विषयात सातवीतील यश राजाराम सावंत तर दहावी मधील रोशनी मोहन बोंगार्डे, श्रावणी गिरीश पोकले, श्रावणी संदीप पोतदार यांनी विशेष प्राविण्यासह सुवर्णपदक प्राप्त केले आहे. इंग्लिश विषयातून इयत्ता सातवीतील …

Read More »

ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत महागली नांगरणी

  एकरी १५००, तर १२०० रुपये रोटर : शेतकऱ्यांना आर्थिक फटका निपाणी (वार्ता) : ट्रॅक्टरद्वारे शेत मशागत महागली असून नांगरणीचा दर एकरी १५०० तर रोटाव्हेटरचा दर एकरी १२०० रुपयांवर पोचला आहे. लागवडीपासून ते मशागतीपर्यंत सर्वच खर्चात मोठी वाढ झाली आहे. मात्र शेतमालाचे दर अजूनही दहा वर्षांपूर्वीच्या पातळीवरच ठप्प असल्याने निपाणी …

Read More »