


निपाणी (वार्ता) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) निपाणी तालुका जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा आरपीआयचे उत्तम कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. अच्युत माने, उपप्राचार्य रवींद्र दिवाकर, बेळगाव जिल्हाध्यक्ष महावीर सहाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. डॉ. अच्युत माने म्हणाले, तालुक्यात हे जनसंपर्क कार्यालय सुरू होणे ही तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या कार्यालयामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांसह नागरिकांना बळ मिळणार असल्याचे सांगितले. कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी, जनसंपर्क कार्यालयामुळे सर्वसामान्य, कष्टकरी, वंचित घटकांवर होणा-या तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय मिळणार असल्याचे सांगितले. तालुकाध्यक्ष राहुल कट्टी यांनीही मनोगत व्यक्त केले.
संजय माने यांनी प्रास्ताविक, राजेंद्र कांबळे सूत्रसंचालन तर चंद्रकांत खातेदार यांनी आभार मानले. कार्यक्रमास तालुका उपाध्यक्ष अक्षय सुतार, निपाणी शहर अध्यक्ष चंद्रकांत खातेदार निपाणी शहर उपाध्यक्ष आकाश कांबळे, अमित वाजरे, सिद्धार्थ कांबळे, बाजीराव कांबळे, राजेंद्र कांबळे, शंकर चौगुले, संजय माने, कपिल कांबळे, सुधाकर सौंदलेकर यांच्यासह विविधसंघटनांचे पदाधिकारी आणि महिला उपस्थित होत्या.

Belgaum Varta Belgaum Varta