


गोकाक व हुक्केरी संघांवर मात; बागलकोट येथील विभागीय स्पर्धेसाठी पात्र
बेळगाव : तालुकास्तरीय दसरा क्रीडा स्पर्धेत अव्वल स्थान पटकावलेल्या साधना संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेतही दमदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. निर्णायक सामन्यांत साधना संघाने गोकाक संघाचा एक डाव व ४ गुणांनी, तर अंतिम सामन्यात हुक्केरी संघाचा एक डाव व १ गुणाने पराभव करून विजेतेपद पटकावले.
या शानदार कामगिरीच्या जोरावर साधना संघाची विभागीय स्तरावरील दसरा क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. येत्या ३० सप्टेंबर रोजी बागलकोट येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत साधना संघ बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
तालुकास्तरापासून जिल्हास्तरापर्यंत सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरी करत साधना संघाने विभागीय स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. संघाच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत असून, बागलकोट येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेतही विजयी घोडदौड कायम ठेवण्याचे आव्हान संघासमोर आहे.
साधना संघाला शिवानंद कोरे यांचे प्रशिक्षण लाभत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta