Tuesday , December 9 2025
Breaking News

कर्नाटक

जातीय जनगणनेला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

  राज्य सरकारला मोठा दिलासा; डेटा उघड न करण्याची अट बंगळूर : कर्नाटक राज्य मागासवर्ग आयोगाकडून करण्यात येत असलेल्या सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणाला (जातीय जनगणना) स्थगिती देण्यास कर्नाटक उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. २५) नकार दिला. हा राज्य सरकारसाठी मोठा दिलासा आहे. जातीय जनगणनेला स्थगिती देण्याच्या याचिकांवर सुनावणी करणाऱ्या मुख्य न्यायाधीश …

Read More »

सर्वेक्षणावेळी “धर्म -हिंदू, जात -मराठा, उपजात -कुणबी आणि मातृभाषा -मराठी” नमूद करण्याचे समितीच्या बैठकीत आवाहन

  बेळगाव : कर्नाटक सरकारने हाती घेतलेल्या सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षणावेळी खानापूर तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी धर्म -हिंदू, जात -मराठा, उपजात -कुणबी आणि मातृभाषा -मराठी असे नमूद करण्याचे आवाहन खानापूरचे माजी आमदार दिगंबरराव पाटील यांनी केले आहे. जातीनिहाय जनगणने संदर्भात आज गुरुवारी पार पडलेल्या खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीमध्ये …

Read More »

पद्मभूषण पुरस्कार विजेते, ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा यांचे निधन

  बंगळूर : कन्नड सारस्वताच्या जगतात सरस्वती पुत्र म्हणून ओळखले जाणारे आणि प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कार विजेते डॉ. एस. एल. भैरप्पा (वय ९४) यांचे आज निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते वयोमानाशी संबंधित आजारांनी ग्रस्त होते. बंगळूर शहरातील राजराजेश्वरी नगर येथील राष्ट्रोत्थान रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचाराला यश न आल्याने …

Read More »

खानापूर तालुक्यात प्री-पेड मीटर योजनेची सुरुवात; तालुक्यातील पहिले प्री-पेड मीटर नवरात्र उत्सव मंडळाला

  खानापूर : खानापूर हेस्कॉम उपविभागात आजपासून प्री-पेड मीटर योजनेचा शुभारंभ करण्यात आला. तालुक्यातील पहिले प्री-पेड मीटर अर्बन बँक चौक येथे नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या श्री दुर्गादेवी नवरात्र उत्सव मंडळाला तात्पुरत्या वीज जोडणीसाठी बसविण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश वीजपुरवठा पारदर्शक आणि अखंडित ठेवण्याचा असून, मोबाईलप्रमाणे रिचार्ज पद्धतीने वीज वापरण्याची ही नवी …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक गुरुवारी

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक गुरुवार दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी दोन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे बोलावण्यात आलेली आहे. तरी म. ए. समितीचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांनी वेळेत हजर रहावे, असे आवाहन खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, माजी आमदार …

Read More »

जातीय जनगणनेला आव्हान देणाऱ्या याचिकेची सुनावणी तहकूब; पुढील सुनावणी आज

  बंगळूर : राज्य सरकारच्या जातीय जनगणनेला आव्हान दिलेलेल्या जनहित याचिकेची (पीआयएल) सुनावणी आज (ता. २३) पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. जातीय जनगणनेला आव्हान देणाऱ्या ब्राहण महासभा वक्कलिग संघाचे वरिष्ठ वकील सुब्बारेड्डी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेची सुनावणी मुख्य न्यायाधीश विभु बक्रू आणि न्यायमूर्ती सी. एम. जोशी यांच्या खंडपीठासमोर झाली. …

Read More »

विश्व विख्यात दसरा महोत्सवाचे शानदार उद्घाटन

  बानू मुश्ताक यांनी चामुंडी देवीला वाहिली पुष्पांजली बंगळूर : जगभरातील लाखो पर्यटकांना आकर्षित करणारा आणि राज्याची कला, संस्कृती, वारसा आणि इतिहासाचे दर्शन घडवणाऱ्या जगप्रसिद्ध दसरा महोत्सवाला आज अधिकृतपणे चालना देण्यात आली. यासह, म्हैसूर या सांस्कृतिक शहरात ११ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुकर पारितोषिक विजेत्या लेखिका बानू …

Read More »

महिलांनी चूल आणि मूल न करता स्वावलंबी बनावे : माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर

  खानापूर : धर्मस्थळ स्वसहाय्य संघाचा तालुकास्तरीय महिला मेळावा खानापूर येथील शनाया गार्डन येथे काल दि. 21 सप्टेंबर रोजी पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून खानापूर तालुक्याच्या माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. अंजली निंबाळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी बोलताना डॉ. अंजलीताई निंबाळकर …

Read More »

घटप्रभा हायस्कूल सलामवाडी येथे सेवानिवृत्त सत्कार सोहळा संपन्न

  दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा हायस्कूल सलामवाडी शाळेचे मुख्याध्यापक बी व्ही पेडणेकर यांनी 33 वर्ष व क्लार्क अरुण ईरपाणा पाटील हे 31वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित केलेल्या शुभेच्छा समारोप प्रसंगी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव विक्रम पाटील, पी. पी. …

Read More »

अतिरिक्त “फी” आकारण्यासंदर्भात अप्पर आयुक्त कार्यालय शालेय शिक्षण विभाग धारवाड यांच्याकडे तक्रार; पाठपुराव्याला यश

  निपाणी : चिक्कोडी जिल्हा शिक्षण केंद्र निपाणीमधील शैक्षणिक संस्थेमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्याकडून जी फी व्यतिरिक्त ज्यादा रक्कम घेतली जात असल्याने सर्व शाळेत पालकांना दिसण्यासारखे फी चे संदर्भात माहिती फलक डिजिटल बोर्ड लावण्यासंदर्भात अनेक वेळा निपाणी बी.ई.ओ. यांना तक्रार केली असून त्यावर योग्य ती कार्यवाही बी.ई.ओ. केली नसल्याने फोर जे आर …

Read More »