Monday , December 23 2024
Breaking News

कर्नाटक

कर्नाटकचे आरोग्यमंत्री सन्माननीय दिनेश गुंडूराव जिजाऊ मंडळाच्या गणरायाच्या चरणी…

  खानापूर : आज कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव, शिवस्मारक चौकातील जिजाऊ गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाच्या दर्शनास पोचले.. डॉ अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी आरोग्यमंत्र्यांना आमच्या गणपती मंडळास भेट देण्याची विनंती केली असता मा. मंत्री महोदयांनी लगेच होकार दर्शविला. आरोग्य मंत्र्याच्या हस्ते गणरायाची आजची आरती संपन्न झाली. जिजाऊ गणेशोत्सव मंडळाच्यावतीने सन्माननीय दिनेश गुंडूराव …

Read More »

६० वर्षीय महिलेचाही माजी खासदार प्रज्वल रेवण्णाकडून लैंगिक अत्याचार; आरोपपत्रात नमूद

  बंगळुरू : माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांनी ६० वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचे एसआयटीने दाखल केलेल्या दुसऱ्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. एसआयटीने माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्याविरुद्ध दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे, जो अश्लील व्हिडिओ आणि बलात्कार प्रकरणात परप्पन अग्रहार कारागृहात कैद आहे. आरोपपत्रातील काही माहिती उपलब्ध झाली …

Read More »

60 खाटांच्या माता व बाल रुग्णालयाचे उद्घाटन व 100 खाटांच्या रुग्णालय इमारतीचा पायाभरणी कार्यक्रम उद्या

  खानापूर : जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत बेळगाव तसेच जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने खानापुर शहरात राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत बांधण्यात आलेल्या 60 खाटांचा माता व बाल रुग्णालयाच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ आणि नाबार्ड RIDF-30 योजनेंतर्गत 100 खाटांच्या तालुका रुग्णालयाच्या नवीन इमारत बांधकामाचा पायाभरणी समारंभ उद्या …

Read More »

गौरी निर्माल्य संकलनाची ८ वर्षे

  दौलतराव पाटील सोशल फाउंडेशनाचा उपक्रम निपाणी (वार्ता) : पर्यावरण संवर्धन करण्याच्या समाजिक भावनेतून येथील दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन, हेल्थ क्लब आणि जायंट क्लबच्या माध्यमातून फाउंडेशनचे संस्थापक आणि टाऊन प्लॅनिंगचे अध्यक्ष सयोजीत उर्फ निकु पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वमालिकेच्या खनीमध्ये गणेश विसर्जन करण्यासह निर्माल्य संकलनाचा उपक्रम सलग ८ वर्षे …

Read More »

गौराई आली सोनपावलांनी!

  निपाणी परिसरात स्वागत : दिवसभर महिलांची लगबग निपाणी (वार्ता) : विघ्नहर्त्या गणरायाच्या प्रतिष्ठापणेनंतर गौरीची स्थापना केली जाते. त्यामुळे दोन दिवसांपासून स्वागताची तयारी केली होती. मंगळवारी (ता.१०) दिवसभर गौरीच्या आवाहनासाठी नदी, तलाव, जलकुंभ आणि विहिरीवर महिलांची लगबग दिसून आली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासह अनेक घरांत मुखवट्याच्या गौरी पुजल्या. या मुखवट्यावर सजावटीसाठी …

Read More »

खानापूर समितीच्यावतीने रविवारी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मान

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने रविवारी (ता. १५) शिवस्मारक येथे सकाळी अकरा वाजता जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले शिक्षक व आदर्श शाळांचा सन्मान केला जाणार आहे. दरवर्षी समितीच्यावतीने मराठी माध्यमाच्या शिक्षकांचा सन्मान केला जातो. यावर्षीही शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेल्या शिक्षक व …

Read More »

१५ सप्टेंबरपासून धावणार हुबळी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस!

    बेळगाव : हुबळी ते पुणे या मार्गावर १५ सप्टेंबरपासून वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. त्यामुळे आता पुणे ते सांगली असा तीन तासांचा प्रवास फक्त ५५ मिनिटांमध्येच पूर्ण होणार आहे. महाराष्ट्रात लवकर विधानसभा निवडणुका असल्यामुळे काही शहरात वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत. १५ सप्टेंबर रोजी देशात १० वंदे …

Read More »

मुडा प्रकरण : मुख्यमंत्र्यांच्या याचिकेची सुनावणी पुन्हा १२ पर्यंत तहकूब

  उच्च न्यायालयात सुनावणी बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकार (मुडा) भूखंड वाटप प्रकरणाशी संबंधित खटला चालवण्यास परवानगी देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी उच्च न्यायालयाने सोमवारी पुन्हा तहकूब केली. पुढील सुनावणी १२ सप्टेंबर रोजी निश्चित करण्यात आली असून, तोपर्यंत सिद्धरामय्या यांना पुन्हा …

Read More »

जिजाऊ गणेश मंडळाच्या आरतीचा मान खानापूर तालुका वनविभाग अधिकाऱ्यांना!

  खानापूर : आज संध्याकाळी जिजाऊ गणेश मंडळाच्या गणरायाची आरती वनविभाग अधिकाऱ्यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी खानापूरच्या एसीएफ सुनिता निंबरगी तसेच नागरगाळीचे एसीएफ शिवानंद मगदूम तसेच खानापूरचे आरएफओ श्रीकांत पाटील, लोंढा आरएफओ तेज साहेब, कणकुंबी आरएफओ शिवकुमार इटनाळ, भिमगड आरएफओ सय्यद नदाफ, तसेच नागरगाळी आरएफओ प्रशांत मंगसुळी साहेब व गोल्याळी …

Read More »

रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरण: एनआयएने केले आरोपपत्र दाखल

  भाजपचे मुख्य कार्यालय होते पहिले लक्ष्य बंगळूर : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सोमवारी (ता. ९) रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात चार आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. १ मार्च २०२४ रोजी ब्रुकफिल्ड, बंगळुर येथील रेस्टॉरंट कमी-तीव्रतेच्या आयईडी स्फोटाने हादरले आणि नऊ जण जखमी झाले होते. एका मोठ्या खुलाशात, एनआयएने दावा केला आहे, …

Read More »