मणगुत्ती : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, लालबहादूर शास्त्री विद्यालय मणगुत्ती, तालुका हुक्केरी येथे झालेल्या तालुकास्तरीय योगा स्पर्धेत लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला या संघाची चिकोडी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या संघामध्ये पुढील विद्यार्थिनींचा सहभाग आहे. कुमारी सुषमा पाटील, दिया धनाजी, दिव्या पाटील, गौतमी पाटील …
Read More »शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज वाटप करण्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे निर्देश
बेंगळुरू : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज सहकार विभागाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना वेळेवर कृषी कर्ज वाटप सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. राज्यात 37 लाख शेतकऱ्यांना 28 हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत 8.69 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना 8,362 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले …
Read More »पोलीस महासंचालक संदीप पाटील यांचे जागतिक ट्रायथलाॅन स्पर्धेत सुयश
बेंगळूर : कर्नाटकचे पोलीस महासंचालक (आयजीपी) आणि बेळगावचे माजी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी कोपनहेगन येथे आयोजित जागतिक ट्रायथलाॅन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करून आपल्या देशासह राज्याचा नावलौकिक वाढवला आहे. डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन येथे नुकतीच जागतिक ट्रायथलॉन स्पर्धा पार पडली. जगातील सर्वात खडतर स्पर्धांपैकी एक असलेल्या या स्पर्धेमध्ये विविध …
Read More »आमदार विठ्ठल हलगेकर डीसीसी बँक निवडणुकीच्या रिंगणात; निवड समितीची घोषणा
खानापूर : खानापूर विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार विठ्ठल हलगेकर हे बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी (डीसीसी) बँकेच्या निवडणुकीच्या शर्यतीत उतरले आहेत. खानापूर येथील शांतिनिकेतन शाळेत गुरुवारी (२८ ऑगस्ट) आयोजित पत्रकार परिषदेत सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी स्थापन केलेल्या निवड समितीचे अध्यक्ष यशवंत बिर्जे यांनी ही माहिती दिली. आमदार विठ्ठल हलगेकर, गर्लगुंजी पीकेपीएसचे …
Read More »संघाचे गीत गाईल्याने कोणाचे मन दुखावले असेल तर माफी मागतो : डी. के. शिवकुमार
काँग्रेसशी माझे नाते भक्त आणि देवासारखे बंगळूर : उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी विधानसभेच्या कामकाजादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) गीताच्या ओळींचा उल्लेख केला होता. यामुळे बराच गोंधळ उडाला आणि काँग्रेस नेत्यांनी स्वतः डी. के. शिवकुमार यांच्या शब्दांवर आक्षेप घेतला. बी. के. हरिप्रसाद यांनी, केपीसीसी अध्यक्ष म्हणून …
Read More »तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत अबनाळी गावच्या विद्यार्थ्यांचे यश; जिल्हा स्पर्धेसाठी दहा विद्यार्थ्यांची निवड
खानापूर : ताराराणी हायस्कूल खानापूर येथे झालेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये शिरोली केंद्रातील अबनाळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. शाळेचे विद्यार्थी स्वप्नील गावकर, सानिका कोवाडकर, सानिका गावकर, मनुजा गावकर व संजना पाटील या पाच विद्यार्थ्यांनी यश मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड सार्थ ठरवली आहे. तसेच शाळेचे माजी विद्यार्थी मंथन …
Read More »धर्मस्थळ प्रकरणात स्फोटक ट्विस्ट: महेश तिमरोडीच्या घरी सापडला मास्कधारी व्यक्तीचा मोबाईल
बेंगळुरू : धर्मस्थळ प्रकरणात आणखी एक घडामोड घडली आहे, निदर्शक महेश तिमरोडीच्या घरी मास्कधारी चिन्नैयाचा मोबाईल सापडला आहे. धर्मस्थळात अनेक ठिकाणी मृतदेह पुरल्याचा दावा करणाऱ्या मास्कधारी चिन्नैयाला एसआयटी अधिकाऱ्यांनी आधीच अटक करून चौकशी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार असे समजते की, चिन्नैयाला महेश तिमरोडी आणि इतर अनेकांनी पाठिंबा दिला होता …
Read More »नंदगडजवळ भीषण अपघात; स्कूल बस आणि दुचाकीच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू
खानापूर : खानापूर तालुक्यातील नंदगडजवळील गर्भाणट्टी येथे स्कूल बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. बिडी गावातून विद्यार्थ्यांना सोडून परत येत असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या बसला नंदगडकडून बिडीकडे जाणाऱ्या दुचाकीने नियंत्रण सुटल्यामुळे धडक दिली. यात दुचाकीवरील दोन्ही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली …
Read More »चन्नेवाडीतील ऐतिहासिक वटवृक्ष कोसळला
खानापूर : चन्नेवाडी ता.खानापूर येथील कलमेश्वर मंदिर परिसरातील चारशे ते पाचशे वर्ष जुना वटवृक्ष पाऊस वाऱ्यामुळे अखेर मुळासकट कोसळला. गावातील जाणकारांच्या मतानुसार हा वटवृक्ष जवळजवळ चारशे ते पाचशे वर्षांपूर्वीचा कलमेश्वर मंदिर जवळ असून, या महाकाय वटवृक्षाबरोबर अनेकांच्या आठवणी जोडलेल्या होत्या. अनेक पारंब्या त्या वटवृक्षाला असल्याने त्या पारंब्याना झोकाळत अनेक …
Read More »काँग्रेस आमदार वीरेंद्र पप्पी यांना २८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी
बंगळूर : बेकायदेशीर बेटिंग कंपनी चालवण्याच्या आरोपांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केलेले काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र पप्पी यांना येथील न्यायालयाने रविवारी २८ ऑगस्टपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत पाठवले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदाराला आज सकाळी सिक्कीमहून बंगळुरला आणण्यात आले. येथील विमानतळावर पोहोचताच ईडीच्या विशेष पथकाने त्यांना ताब्यात घेतले. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta