Thursday , December 11 2025
Breaking News

कर्नाटक

कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती विभू बखरू शपथबद्ध

  राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिली मुख्य न्यायाधीशांना शपथ बेंगळुरू : न्यायमूर्ती विभू बखरू यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. माननीय राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी आज राजभवनातील ग्लास हाऊस येथे आयोजित समारंभात माननीय मुख्य न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, विधान परिषदेचे अध्यक्ष बसवराज होरट्टी, उपमुख्यमंत्री …

Read More »

केएसआरटीसी कर्मचाऱ्यांवर सहा महिन्यांसाठी ‘एस्मा’चा बडगा

  वाहतूक कर्मचाऱ्यांना सरकारकडून धक्का बंगळूर : गेल्या ३८ महिन्यांपासून भत्ता आणि पगारवाढ यासह विविध मागण्यांसाठी ५ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याची योजना आखणाऱ्या वाहतूक कर्मचाऱ्यांना कामगार विभागाने निषेध करण्यापासून परावृत्त करण्यासाठी ‘एस्मा’ जारी केला आहे. पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतलेल्या परिवहन कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने धक्का दिला आहे. …

Read More »

म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथे निवडणूक संपन्न!

  खानापूर : भारत प्रजासत्ताक देश आहे, जिथे लोकशाहीला अनन्य साधारण महत्त्व आहे. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी लोकशाहीत कारभार चालवितात म्हणूच त्यांना लोकप्रतिनिधी असे संबोधन केले जाते. लोकशाहीत मतदाराला “राजा” असे आदराने म्हटले जाते, कारण मतदारच राजकारणाचा कर्ताकरविता असतो.. निवडणूक ही लोकप्रतिनिधींना निवडून देण्याची एक सुक्ष्म प्रक्रिया असते, ती प्रकिया …

Read More »

निपाणी परिसरात युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप

  निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी तालुका यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमाला जोर निपाणी तालुक्यातील उच्च प्राथमिक मराठी शाळा मांगूर, कून्नुर, कोगनोळी, दत्तवाडी, गजबरवडी, अडी, बेनाडी, बारवाड, काररदगा येथे युवा समिती निपाणी तालुका पदाधिकाऱ्यांनी शैक्षणिक साहित्य वाटप केले. यावेळी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी अध्यक्ष श्री. अजित …

Read More »

मराठी भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी युवा समिती नेहमी अग्रेसर : युवा कार्यकर्ते अभिजीत सरदेसाई

  खानापूर : सरकारी मराठी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने खारीचा वाटा उचलला आहे. त्याचे येणाऱ्या काळात चांगले परिणाम दिसून येतील, असे प्रतिपादन महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा कार्यकर्ते अभिजीत सरदेसाई यांनी व्यक्त केले आहे. युवा समितीच्यावतीने गुरुवारी खानापूर तालुक्यातील करंबळसाह विविध गावांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण …

Read More »

बेंगळुरूमधील ४० खाजगी शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी

  बंगळूर : शहरातील शाळांना बॉम्बच्या धमक्यांचे ईमेल येणे सुरूच आहे, केंगेरी आणि राजराजेश्वरी नगरसह शहरातील ५० हून अधिक खासगी शाळांना आज सकाळी समाजकंटकांकडून बॉम्बच्या धमक्यांचे ईमेल आले. मात्र हे दमक्यांचे ईमेल खोटे असल्याचे तपास केल्यानंतर पोलिसांनी सांगितले. सकाळी ७.२४ वाजता roadkill333@atomicmail.io या वापरकर्त्याकडून ‘शाळेत बॉम्ब’ या विषयाचा एकच, समान …

Read More »

ग्रामपंचायत सदस्याचा अनैतिक संबंधातून निर्घृण खून; शरीराचे तुकडे हिरण्यकेशी नदीत फेकले!

  कोल्हापूर : कोल्हापुर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावाच्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामपंचायत सदस्याचा निर्घृण खून करून मृतदेह संकेश्वरजवळ हिरण्यकेशी नदीत फेकून देण्यात आले. लखन बेनाडे असे ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. मागील आठ दिवसांपासून बेनाडे हे बेपत्ता होते, बेनाडे यांच्या शरीराचे दोन तुकडे करून मृतदेह कर्नाटकमधील हिरण्यकेशी नदीत …

Read More »

कोलकातामध्ये तरुणीवर बलात्कार प्रकरणी बागलकोटमधील तरुणाला अटक

  बागलकोट : कोलकातामधील एका तरुणीला वसतिगृहात बोलावून बलात्कार केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी बागलकोट येथील एका तरुणाला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव परमानंद टोपनावर असे आहे. तो लोकापुराचा रहिवासी आहे. तो कोलकातामधील जोका येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये एमबीएच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. तरुणीने आरोप केला आहे की …

Read More »

चिन्नास्वामी चेंगराचेंगरी प्रकरण : आरसीबी, कर्नाटक राज्य असोसिएशन विरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्याचा निर्णय

  बेंगळुरू : रॉयल चॅलेंज बेंगळुरू आयपीएल जिंकल्याच्या पार्श्वभूमीवर विजयोत्सवादरम्यान बेंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला. या घटनेला जबाबदार धरून आरसीबी व्यवस्थापनवर फौजदारी खटला दाखल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. न्यायाधीश डी. कुन्हा आयोगाने चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीबाबतचा अहवाल आधीच सादर केला आहे, ज्यामध्ये पोलिसांचा …

Read More »

बैलूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव कुत्रा ठार!

  खानापूर : तालुक्यातील बैलूर येथील शेतकऱ्याच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून त्याची शिकार केल्याची घटना बुधवार दिनांक 16 जुलै रोजी घडली आहे. बैलूर येथील शेतकरी नारायण कृष्णा कणकुंबकर त्यांचा मुलगा पुंडलिक कणकुंबकर हे गुरे चारण्यासाठी शेताकडे गेले होते. या शेताकडे जाण्यासाठी जंगलातून रस्ता जातो या रस्त्यावरून पुंडलिक व त्याच …

Read More »