Monday , September 21 2026
Breaking News

कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती विभू बखरू शपथबद्ध

Spread the love

 

राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिली मुख्य न्यायाधीशांना शपथ

बेंगळुरू : न्यायमूर्ती विभू बखरू यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. माननीय राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी आज राजभवनातील ग्लास हाऊस येथे आयोजित समारंभात माननीय मुख्य न्यायाधीशांना पदाची शपथ दिली.

यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, विधान परिषदेचे अध्यक्ष बसवराज होरट्टी, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, कर्नाटक उच्च न्यायालयाचे कार्यवाहक न्यायाधीश व्ही. कामेश्वर राव, कायदा, संसदीय कामकाज आणि पर्यटन मंत्री एच.के. पाटील, नगरविकास आणि नगररचना बी.एस. सुरेश (भैरथी), मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव नसीर अहमद, मुख्यमंत्र्यांचे कायदेशीर सल्लागार ए.एस. पोन्नन्ना, विधान परिषदेचे सदस्य नागराज यादव, कर्नाटक राज्य हमी योजना अंमलबजावणी प्राधिकरणाचे अध्यक्ष एच.एम. रेवन्ना, सरकारच्या मुख्य सचिव डॉ. शालिनी रजनीश, मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार के.व्ही. प्रभाकर, मुख्यमंत्र्यांचे सचिव बी.बी. कावेरी, कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, वकील, इतर मान्यवर आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *