Sunday , December 22 2024
Breaking News

कर्नाटक

तालुका महाराष्ट्र एकीकरण व युवा समिती निपाणी यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप

  निपाणी : तालुका महाराष्ट्र एकीकरण व युवा समिती निपाणी यांच्या वतीने निपाणीतील ग्रामीण भागातील मराठी शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कुर्ली व सौंदलगा येथे उच्च प्राथमिक मराठी शाळांमध्ये वाटप केले. मराठी शाळा व भाषा वाचविण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना मराठी मातृभाषेतून शिक्षण घेण्यासाठी …

Read More »

वाल्मिकी घोटाळ्यातील मुख्य आरोपीच्या घरात सापडले १० किलो सोने

  बंगळूर : वाल्मिकी विकास महामंडळाचे कोट्यवधी रुपयाच्या घोटाळ्याचा तपास तीव्र करणाऱ्या सीआयडी आणि एसआयटीच्या तपास पथकाने मुख्य आरोपी सत्यनारायण वर्माच्या घरात लपवून ठेवलेली १० किलो सोन्याची बिस्किटे जप्त केली आहेत. तसेच हैदराबाद येथील फ्लॅटमध्ये ८ कोटी रुपये जप्त केले आहेत. वाल्मिकी घोटाळ्याच्या पैशाने सोने खरेदी केल्याचे उघडकीस आल्यानंतर आरोपी …

Read More »

पीओपी मूर्तींना आळा घालण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना

  एकेरी वापराच्या प्लास्टिकवरही निर्बंध बंगळूर : एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यभर मार्शलचा समावेश असलेले टास्क फोर्स स्थापन केले जाईल. यावर्षी गणेश चतुर्थी दरम्यान प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तींचा वापर केला जाणार नाही याची खात्री करण्यासाठी देखील टास्क फोर्स कठोरपणे काम करेल, वन आणि पर्यावरण मंत्री ईश्वर …

Read More »

मणतुर्गा येथे घर कोसळून नुकसान

  खानापूर : खानापूर तालुक्यातील मणतुर्गे गावातील प्रकाश रावबा देवकरी, सूर्याजी गणपती देवकरी, हणमंत देवकरी यांच्या राहत्या घराची भिंत अतिवृष्टीमुळे कोसळली असून ती घराशेजारी असलेल्या श्री नागेश देव मंदिरावर पडली. त्यामुळे मंदिराचे देखील नुकसान झाले आहे. दुपारच्या वेळी देवकरी कुटुंबीय कामानिमित्त घराबाहेर गेलेले असताना भिंत कोसळली, त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी …

Read More »

राष्ट्रीय महामार्गावरील दुहेरी वाहतूक सुरु; यमगर्णी येथे जोडला रस्ता

  निपाणी (वार्ता) : सलग चार दिवस होणाऱ्या पावसामुळे पुणे- बंगळुर राष्ट्रीय महामार्गावरील मांगुर फाट्याजवळ सेवा रस्ता आणि शेतीवाडीतील पाणी आल्याने विस्कळीत झाली होती. तर शुक्रवारी (ता.२६) एकेरी वाहतूक सुरू होती. शनिवारी (ता.२७) पहाटेपासूनच पाऊस थांबण्यासह पाणी वाहून गेले. तसेच यमगर्णी येथे महामार्ग रस्ता जोडल्याने दुहेरी वाहतूक सुरू झाली आहे. …

Read More »

निपाणीचा जवाहर तलाव ओव्हर फ्लो

  नगरपालिकेने सोडला सुटकेचा निःश्वास निपाणी (वार्ता) : निपाणीची जीवनदायिनी असणारा जवाहर तलाव आठवडाभराच्या मुसळधार पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरला. यंदा सुरुवातीपासूनच शहर आणि परिसरात चांगला पाऊस झाला. त्यामुळे तलाव भरून पाणी तलावाबाहेर पश्चिमेकडील बाजूने बाहेर पडले. त्यामुळे वर्षभराचा पाणी प्रश्न निकालात निघाला असून नगरपालिका प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. आता …

Read More »

पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक संथगतीने

  मांगुर फाट्यावरून वाहतूक बंद; पोलिसासह महसूल विभाग घटनास्थळी निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात चार दिवसापासून पडणाऱ्या दमदार पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी (ता.२६) सकाळपासूनच पावसाचा जोर वाढल्याने मांगुर फाट्यावर सेवा रस्त्यासह शेतीवाडीतील पाणी आल्याने दुचाकी स्वारांची तारांबळ उडाली. शिवाय महामार्गावरील वाहतूक मंद गतीने सुरू …

Read More »

राज्याच्या मुख्य सचिवपदी शालिनी रजनीश यांची नियुक्ती

  बेंगळुरू : राज्य सरकारचे मुख्य सचिव रजनीश गोयल 31 जुलै रोजी निवृत्त होत आहेत आणि शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांच्या पत्नी शालिनी रजनीश यांची राज्य सरकारच्या पुढील मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री …

Read More »

जिल्हा पालकमंत्र्यांनी केली खानापूर तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी

  मंत्री सतीश जारकीहोळी यांनी जनतेच्या तक्रारी स्वीकारून समस्या सोडविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या बेळगाव : जिल्ह्यातील संभाव्य अतिवृष्टी/पुराच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी शुक्रवारी (26 जुलै) खानापूर तालुक्यातील पूरग्रस्त व पावसाने नुकसान झालेल्या भागांना भेट दिली. जांबोटी रोडवरील कुसमळी पूल, त्यानंतर खानापूर ते जांबोटीला जोडणाऱ्या मध्यभागी …

Read More »

जवाहर तलावातील गाळ काढल्यास पाणीसाठा वाढेल : पंकज गाडीवड्डर यांचे पत्रक

  निपाणी (वार्ता) : दमदार पडलेल्या पावसामुळे येथील शहरासह उपनाराला पाणीपुरवठा करणारा जवाहरलाल तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहे. दोन दिवसात तलाव ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. दरवर्षी हा तलाव भरूनही शहरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे तलावातील गाळ काढला असता तर मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होऊन शहरवासीयांच्या पाण्याचा प्रश्न मिटला असता. पण …

Read More »