Monday , December 23 2024
Breaking News

कर्नाटक

बोरगाववाडीतील मोहरमला ५०९ वर्षाची परंपरा

  मंगळवारी मुख्य दिवस ; गावात मुस्लिम बांधव नसताना उत्सव निपाणी (वार्ता): निपाणी तालुक्यातील बोरगाववाडी गावात एकही मुस्लिम समाज बांधव वास्तव्यास नसताना लिंगायत व इतर समाजातर्फे मोहरम सण साजरा केला जातो. या सणाला शुक्रवार (ता. १२) पासून प्रारंभ झाला आहे. बुधवार (ता. १७) अखेर चालणाऱ्या या सणाचे यंदाचे ५०९ वे …

Read More »

आठवणीत रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह‌मेळावा!

  निपाणीत सोहळा : ३४ वर्षांनी वर्गमित्र जमले एकत्र निपाणी : तब्बल ३४ वर्षानंतर व्हीएसएम. जी आय. बागेवाडी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवार दि. १४ रोजी उत्साहात पार पडला. निपाणीतील संगम पॅराडाईज येथे दिवसभर झालेल्या स्नेह‌मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक आप्पासाहेब केरगुटै उपस्थित होते. प्रारंभी सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर …

Read More »

सेवा योजनेत माजी सैनिकांचे योगदान महत्त्वाचे

  उपप्राचार्य डॉ. आर. जे. खराबे : आजी, माजी सैनिकांचा सत्कार निपाणी (वार्ता) : स्वतःचे ध्येय निश्चित करुन ध्येयासाठी वेळ दिला पाहिजे. दररोज व्यायाम करून शरीर धष्टपुष्ट बनवले पाहिजे. देश सेवा ही श्रेष्ठ सेवा आहे. अशा शिबिरांच्यामुळे युवकांच्यात कार्य करण्याचा उत्साह वाढतो. वेगवेगळ्या सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिल्यावर समाजसेवा करण्याची …

Read More »

वाचनामुळे व्यक्तिमत्त्व, चारित्र्याचा विकास

  दत्तात्रय लवटे : पुस्तक वितरण कार्यक्रम निपाणी (वार्ता) : थोर व्यक्तींचे चरित्रे आपणास प्रेरणेनेसह जगण्याची दिशा दाखवतात. पुस्तक वाचताना आपण स्वतःला हरवून जातो. तर पुस्तक वाचनामुळे माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा व चारित्र्याचा विकास होतो, हे स्पष्ट करून ग्रंथालयातील पुस्तकांचा वापर कसा करावा व नोंदी कशा ठेवाव्यात पुस्तके कशी हाताळावी हे स्पष्ट …

Read More »

जखमी मोराला वनरक्षकाकडे स्वाधीन

  दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येतील एम ए पाटील यांच्या शेतात मशागत करत असताना जखमी मोर सापडला. शेतात मक्का पिकाला लागवड टाकत असताना त्यांचे चिरंजीव उदय पाटील यांच्या समोर झाडावरून अचानक भला मोठा पक्षी खाली पडला. त्यांनी हातातील काम सोडून पाहिले तर राष्ट्रीय पक्षी मोर खाली पडला होता. तो …

Read More »

खानापूरकडे येणाऱ्या कारचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

  हावेरी : बेळगाव जिल्ह्यातील शिगावजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळल्याने चार तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुदीप कोटी (18) आणि निलप्पा मुलीमणी (23) यांचा जागीच मृत्यू झाला तर शिवनगौडा यल्लनगौडा (20) आणि कल्मेश मानोजी (26) यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मृत हे सावनूर तालुक्यातील …

Read More »

कटलरी दुकानाला शॉर्टसर्किटने आग लागून चार लाखाचे नुकसान

  निपाणी (वार्ता) : येथील बस स्थानकावरील छत्रपती धर्मवीर संभाजीराजे चौकाजवळ असलेल्या एका कटलरी दुकानाला शॉर्टसर्किटने आग लागून सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी (ता.१२) रात्री साडेनऊ वाजता सुमारास घडली. या घटनेमध्ये निशिकांत बागडे यांच्या दुकानातील प्लास्टिकचे सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. अग्निशामक दलाच्या कार्यतत्परतेमुळे परिसरातील आग …

Read More »

राष्ट्रीय सेवा योजनेमुळे युवकांमध्ये काम करण्याची उर्मी

  धनाजी पाटील; चिखलव्हाळमध्ये शिबिराची सांगता निपाणी (वार्ता) : राष्ट्रीय सेवा योजनांच्या शिबिरांमुळे युवकांमध्ये कार्य करण्याचा उत्साह वाढतो. वेगवेगळ्या सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिल्यावर समाजसेवा करण्याची आवड निर्माण होते. समाजात वेगळ्या प्रकारची जनजागृतीही राष्ट्रीय सेवा योजना करत असते. याचा चिखलव्हाळ गावातील नागरिक आणि शिबिरार्थीनी लाभ झाला आहे, असे मत ग्रामपंचायत …

Read More »

सातवा वेतन आयोग लागू न केल्यास आंदोलन

  सरकारी कर्मचारी संघटनेचा इशारा ; आमदार शशिकला जोल्ले यांना निवेदन निपाणी (वार्ता) : सरकारने तात्काळ सातवा वेतन आयोग लागू करावे, या मागणीसाठी कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे आमदार शशिकला जोल्ले आणि उपतहसीलदार मृत्युंजय डंगी यांना शुक्रवारी (ता.१२) देण्यात आले. निवेदनातील माहिती अशी, सातव्या वेतन आयोगाचा सरकारला सादर केलेला अहवाल …

Read More »

माडीगुंजी गावात डास निर्मूलन औषधाच्या फवारणीची मागणी

  खानापूर : सध्या पावसाळा सुरू आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास वाढली आहे. खानापूर तालुक्यातील माडीगुंजी गावात डास आणि माशांनी अक्षरशः थैमान घातले आहे. डेंग्यू, मलेरियासारखे रोग फैलावत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने वेळीच लक्ष घालून संपूर्ण गावात डास निर्मूलन औषधांची फवारणी करावी, अशी मागणी गावातील युवा कार्यकर्ते आणि नागरिकांनी ग्रामपंचायत पीडीओकडे …

Read More »