बेळगांव : दुरुस्ती व विजवाहिन्या तपासणीच्या कारणास्तव बेळगावसह खानापूर तालुक्यातील काही गावांचा वीजपुरवठा रविवारी दि. 19 रोजी खंडित होणार आहे. ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन हेस्कॉमने केले आहे. बेळगाव तालुक्यातील हालगा, बस्तवाड, शगनमट्टी, कमकारहट्टी, कोळीकोप्प, बडेकोळमठ, मास्तमर्डी बसरीकट्टी, शिंदोळी, मुतगा, श्रीराम कॉलनी, सारिगेनगर, महालक्ष्मीपुरम, साईनगर, भरतेश कॉलेज, शिंदोळी क्रॉस, निलजी …
Read More »बारावी परीक्षेचा निकाल 61.88 टक्के
दक्षिण कन्नड प्रथम; बेळगावचा निकाल 59.88 टक्के बेंगळुरू : कर्नाटक राज्य पदवीपूर्व शिक्षण मंडळाने घेतलेल्या 2021-22च्या पीयूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. निकालात दक्षिण कन्नड जिल्हा शेकडा 88.02 सह राज्यात प्रथम आला असून त्याच्याच शेजारचा उडुपी जिल्हा द्वितीय आला आहे. विजापूर जिल्हा तिसर्या स्थानावर आहे. गेल्या एप्रिल 23 …
Read More »केंद्राने ‘अग्निपथ’ रद्द करून आंदोलनकर्त्यांशी चर्चा करावी : विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या
हुबळी : केंद्र सरकारने अग्निपथ योजना रद्द करून आंदोलनकर्त्यांशी चर्चा करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केली. हुबळी येथे शनिवारी पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, केंद्राच्या अग्निपथ योजनेला काँग्रेसचा विरोध आहे. 4 वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची काय परिस्थिती होईल याचा विचार केंद्राने केला आहे का? या योजनेच्या …
Read More »अग्निपथ विरोधात खानापूरात तरूणाईचा आक्रोश मोर्चा
आमदार डॉ. अंजलीताईंची तरूणाईला साथ : मोर्चात सहभागी खानापूर : आज संपूर्ण भारतात तरूण मुले मोदी सरकार विरोधात उभी ठाकली असून त्याचा प्रत्यय आज खानापूरात आला. तमाम तरूण मंडळी, होतकरू, आर्मीमध्ये भरतीसाठी मेहनत करणारे सर्व तरुण, माजी निवृत्त सैनिक तसेच आमदार अंजलीताई निंबाळकर आज सकाळी मलप्रभा ग्राऊंडवर जमले. तिथून मोदी …
Read More »पाठ्य पुस्तकातील समस्या मार्गी लावा : राजेंद्र पवार वड्डर
शिक्षकांची गैरसोय, शिक्षण मंत्र्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : कोरोना महामारीमुळे तब्बल दोन वर्षांनी कर्नाटकातील सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. सुटीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता अत्यंत खालावली आहे. त्यांची गुणवत्ता पुन्हा वाढविण्यासोबत सन २०२२-२३ सालातील शिक्षण शिकविण्यासाठी शिक्षक तयार असताना शिक्षण विभाग आणि सरकार यांच्यात मेळ नसल्याने पाठ्य पुस्तकातील होत असलेल्या निष्काळजीपणामुळे …
Read More »कणगला लाईफ केअरतर्फे पुंडलिक करिगार यांचा सत्कार
संकेश्वर (महंमद मोमीन) : कणगला एच.एल.एल. कंपनीतर्फे सेवानिवृत्ती निमित्त पुंडलिक करिगार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कणगला एच.एल.एल कंपनीत पुंडलिक करिगार हे ३५ वर्षे सिनियर बाॅयलर ऑपरेटर म्हणून सेवा बजावून निवृत झाले आहेत. सेवानिवृतीबद्दल पुंडलिक करिगार यांचा एच.एल.एल. कंपनीचे युनिट प्रमुख के.नरेश, एच.आर.चे विरेंद्र सर यांच्या हस्ते सत्कार करून …
Read More »ईदलहोंड मराठी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
खानापूर : शहरातील नियती फाउंडेशनतर्फे आज खानापूर तालुक्यातील ईदलहोंड मराठी माध्यमिक शाळेतील यंदाच्या दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवलेल्या दहा गुणवंत विद्यार्थी -विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. ईदलहोंड (ता. खानापूर) येथील मराठी माध्यमिक शाळेमध्ये आज गुरुवारी आयोजित कार्यक्रमात बेळगावच्या सुप्रसिद्ध डॉक्टर सोनाली सरनोबत यांच्या नियती फाउंडेशनतर्फे दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुणांसह मराठी माध्यमात …
Read More »ग्राहक पीठासाठी वकिलांची खानापुरात निदर्शने
खानापूर : बेळगाव येथे स्थापन करण्यात येणार्या ग्राहक पीठाचे कलबुर्गी येथे स्थलांतर केल्याच्या निषेधार्थ खानापूर तालुका वकील संघटनेच्या वतीने आज निदर्शने करण्यात आली. बेळगावात स्थापन करावयाच्या ग्राहक पीठाचे कलबुर्गी येथे स्थलांतर केल्याच्या निषेधार्थ बेळगावात वकिलांनी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकून आंदोलन सुरु केले आहे. खानापुरातही या आंदोलनाचे लोण पसरले. खानापूर वकील …
Read More »निपाणीत केएलई, रोटरीच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील के. एल. ई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पीटल आणि निपाणीतील रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने आयोजित थायरॉईड स्क्रीनिंग आणि ब्लड शुगर व एंडोक्राइनोलॉजी या आजारावर आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर रोटरी हॉलमध्ये पार पडले. त्याला रूग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये 110 रूग्णांनी सहभाग नोंदवित आरोग्य तपासणी …
Read More »रोपांची लागवड करून साजरी केली वटपोर्णिमा
दौलतराव पाटील फाउंडेशनच्या महिलांचा उपक्रम : परंपरा व पर्यावरणाची घातली सांगड निपाणी (विनायक पाटील) : परंपरा व पर्यावरणाची सांगड घालत येथील दौलत नगरातील दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन, हेल्थ क्लब आणि जायंट्स क्लबच्या माध्यमातून वटवृक्षाच्या रोपांची निर्मिती करून महिलांनी वटसावित्री सण साजरा केला. शिवाय वृक्षारोपण करून रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करण्याचा संकल्प …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta