Sunday , September 20 2026
Breaking News

अग्निपथ विरोधात खानापूरात तरूणाईचा आक्रोश मोर्चा

Spread the love

आमदार डॉ. अंजलीताईंची तरूणाईला साथ : मोर्चात सहभागी
खानापूर : आज संपूर्ण भारतात तरूण मुले मोदी सरकार विरोधात उभी ठाकली असून त्याचा प्रत्यय आज खानापूरात आला. तमाम तरूण मंडळी, होतकरू, आर्मीमध्ये भरतीसाठी मेहनत करणारे सर्व तरुण, माजी निवृत्त सैनिक तसेच आमदार अंजलीताई निंबाळकर आज सकाळी मलप्रभा ग्राऊंडवर जमले. तिथून मोदी सरकार विरोधी घोषणा देत शिवस्मारक चौकात पोहचले.
सरकार विरोधी घोषणाबाजी
मोदी सरकार विरूद्धचा आक्रोश घोषणाद्वारे बाहेर पडत होता. मोर्चा शांततेत पार पडला.
शेवटी तहसिलदार यांना निवेदन दिले. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात होता. रॅपीड ॲक्शन फोर्स व वरिष्ठ पोलीस अधिकारी मोर्चा सोबत चालत होते.
यावेळी आमदार अंजलीताई निंबाळकर बोलताना म्हणाल्या की, मोदी सरकारने सैनिकांच्या अपमान केला आहे. मोदी सरकार भ्रष्ट असून मी शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहील.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *