संकेश्वर (वार्ता) : सीमाभागातील लोकांना महाराष्ट्रातील किटवाड धरणाचे पाणी मिळवून देण्यासाठी दोन्ही राज्यांच्या पाटबंधारे मंत्रींबरोबर चर्चा करुन प्रस्ताव मांडला जाणार असल्याचे खासदार संजयदादा मंडलिक यांनी सांगितले. संकेश्वर विश्रामधाम येथे आज कर्नाटक राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं, चंदगडचे आमदार राजेश पाटील आणि दोन्ही राज्याचे पाटबंधारे अधिकारांशी चर्चा …
Read More »कोरोनाचे नियम हिंदूंनाच का? : प्रमोदजी मुतालिक
संकेश्वर (वार्ता) : कोरोनाचे काटेकोरपणे पालन फक्त हिंन्दूंनीच करावयाचे काय? कोरोनाचा एकाला एक तर दुसर्याला दुसरा नियम असल्याचे श्रीरामसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोदजी मुतालिक यांनी आज सायंकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, सरकार कोरोना नियमात देखील दुजाभाव करीत आहे. कोरोनाचे सर्व नियम हिंदूंना लागू केले जात आहेत. त्यामुळे हिन्दूंचे सर्व …
Read More »हंचिनाळ ते कोगनोळी रस्त्याच्या डांबरीकरणासंदर्भात मंत्री शशिकला जोल्ले यांना ग्रामस्थांतर्फे निवेदन
कोगनोळी (वार्ता) : हंचिनाळ ते कोगनोळी पाच किलोमीटर रस्त्याची मागील कित्येक वर्षांपासून दयनीय अवस्था झाली असून या मार्गावरून वाहन चालवणे अत्यंत कठीण झाले आहे. रस्त्याचे मजबूतपणे त्वरित डांबरीकरण करण्याची मागणी निवेदनाद्वारे मंत्री शशिकला जोल्ले यांच्याकडे ग्रामस्थांनी केली आहे. हंचिनाळ ते कोगनोळी हा रस्ता मागील कित्येक महिन्यांपासून खराब झाला असून रस्त्यात …
Read More »सहकारी संघामुळेच शेतकर्यांचा विकास
लक्ष्मीसेन भट्टारक स्वामी : बोरगाव येथे जीनलक्ष्मी संस्थेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : शासकीय स्तरावर शेतकर्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. पण अंमलबजावणी वेळेवर होत नाही. शेतकर्यांचे अडीअडचणी लक्षात घेऊन गरजवंतांना वेळेत पत मंजूर करून शेतकर्यांचा जीवन उंचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न ग्रामीण भागातील सहकारी संस्था व संघ करीत आहेत. गाव, समाज व शेतकर्यांचे …
Read More »खानापुरात सोमवारी हुतात्म्यांना होणार एकत्रित अभिवादन!
खानापूर (वार्ता) : 1956 मध्ये मराठी भाग कर्नाटकात डांबल्यामुळे सीमाभागात झालेल्या आंदोलनात मारुती बेन्नाळकर, मधू बांदेकर, लक्ष्मण गावडे, महादेव बारगडी, नागाप्पा होसुरकर, कमलाबाई मोहिते यांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी सोमवार दि. 17 जानेवारी रोजी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि कार्यकर्ते एकत्रित येऊन हुतात्मा दिन गांभीर्याने …
Read More »निपाणीत एकाच महाविद्यालयातील 18 विद्यार्थ्यांना लागण
ग्रामीण भागातील पाच जण पॉझिटिव्ह निपाणी (वार्ता) : सर्वत्र थैमान माजवलेल्या कोरोना महामारीची तिसरी लाट निपाणीत दस्तक न देता सरळ दहशत निर्माण करणारी ठरली आहे. गुरुवारी (ता.13) निपाणीतील एका प्रतिष्ठित महाविद्यालयाध्ये एकाच वेळी 18 विद्यार्थी कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. तर या व्यतिरिक्त उपनगर आणि ग्रामीण भागातील पाच जण …
Read More »काँग्रेसची अखेर मेकदाटू पदयात्रेतून माघार
न्यायालयाच्या निर्देशाचे पालन, कोविड संसर्गाचे कारण बंगळूर (वार्ता) : जनतेच्या तिखट टीका आणि कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत काँग्रेसने गुरुवारी मेकेदाटू पदयात्रा अखेर मागे घेती. बुधवारी संध्याकाळी पदयात्रेवर बंदी घालण्याचा आदेश राज्य सरकारने जारी केला होता. बुधवारी संध्याकाळी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार हे दोघेही बंगळुरला परतल्याने …
Read More »खानापूर टाऊन पंचायत मुख्य अधिकारी पदी माने
खानापूर (वार्ता) : खानापूर शहरातील टाऊन पंचायतीच्या मुख्य अधिकारीपदी बाबासाहेब माने यांनी मंगळवारी दि. 11 रोजी आपल्या पदाची सुत्रे स्विकारली. खानापूर टाऊन पंचायतीच्या मुख्य अधिकारी विवेक बन्ने यांची बेळगाव येथे बदली झाली. त्यामुळे खानापूर टाऊन पंचायतीचे मुख्य अधिकारी पद रिक्त होते. त्या पदी बाबासाहेब माने रूजू झाले. बाबासाहेब माने यांनी …
Read More »गाणिग समाजाला 2 ए प्रमाणपत्र व सिधुत्व प्रमाणपत्राची निवेदनाद्वारे मागणी
खानापूर (वार्ता) : खानापूर तालुक्यातील गाणिग समाजाच्या विद्यार्थी वर्गाला 2 ए प्रमाणपत्र तसेच सिधुत्व प्रमाणपत्र देण्यात यावे. या मागणीसाठी खानापूर तालुका गाणिग समाज अभिवृध्दी संस्थेच्यावतीने उपतहसीलदार के. आर. कोलकार यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गाणिग समाजाच्या विद्यार्थी वर्गाला शिक्षणासाठी 2ए प्रमाण पत्र तसेच सिधुत्व प्रमाणपत्र देण्याची …
Read More »अतिथी प्राध्यापकांचे खानापूर तहसीलदारांना निवेदन
खानापूर (वार्ता) : कर्नाटक राज्यातील पदवी महाविद्यालयात अतिथी प्राध्यापक म्हणून गेली कित्येक वर्षे अत्यंत कमी पगारात सेवा बजावत आहेत. खानापूर शहरातील सरकारी पदवी महाविद्यालय तसेच बिडी येथील पदवी महाविद्यालय येथे अनेक प्राध्यापक कमी पगारात सेवा बजावत आहेत. कमी पगारात कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तेव्हा अतिथी प्राध्यापकांना …
Read More »