खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीतून ३ हजार पत्रे सीमाप्रश्नी पंतप्रधानांना पाठविण्याचा संकल्प करण्यात आला.खानापूर तालुक्यातील समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे गाव गर्लगुंजी या गावातून सीमाप्रश्नी पंतप्रधानांना पत्रं पाठवण्याच्या उपक्रमाला उत्स्फूर्त पाठिंबा जाहिर करून खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना हजारो पत्रं सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ९ ऑगष्ट क्रांती दिनी पाठवण्याचा …
Read More »२३ तक्रारींना खानापूर मेघा लोकअदालतीत मिळाला न्याय
खानापूर प्रतिनिधी) : खानापूर येथील न्यायालयात शनिवारी मेघा लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी या मेघा लोकअदालतीतून २३ तक्रारी निकालात निघाल्या.मेघा लोकअदालतीला बेळगाव जिल्हा न्यायाधिश श्री. हेमंतकुमार, न्यायाधिश शिरोळी, खानापूर न्यायाधिश पी. मुरलीमनोहर रेड्डी, एस. सुर्यनारायण तसेच खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. ईश्वर घाडी होते.शनिवारी झालेल्या स्पेशल मेघा लोकअदालतमध्ये सहकारी क्षेत्रातील …
Read More »बसचे ब्रेक निकामी झाल्याने तहसील कार्यालयाची संरक्षणभिंत कोसळली
खानापूर (प्रतिनिधी) : रविवारी खानापूर शहारातील शिवस्मारक चौकातील बसस्थानकाजवळ बसचे ब्रेक निकामी झाल्याने आणि बस मागे गेल्याने तहसील कार्यालयाची संरक्षण भिंत कोसळली. मात्र जीवीत हानी टळली.याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार खानापूर आगाराची खानापूर बेळगाव बस क्रमांक के. ए. २५ एफ ३२२९ ही दुपारी १ वाजण्याच्या सुमारास खानापूर हून बेळगावला जाण्यासाठी शिवस्मारक …
Read More »पीटर डिसोझा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
खानापूर (प्रतिनिधी) : माचीगड (ता. खानापूर) गावचे सुपुत्र व पणे येथील रहिवासी पीटर डिसोझा यांचा वाढदिवस शनिवारी दि. ७ रोजी पुणे येथे उत्साहात पार पडला.पीटर डिसोझा यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छावेळी बोलताना ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे संचालक शिवाजी जळगेकर म्हणाले की, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, शासकीय, राजकीय, उद्योग, व्यापार, कृषी, आदी क्षेत्रात आपली बैठक दांडगी …
Read More »कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात खानापूरात चर्चा
खानापूर (प्रतिनिधी) : आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भिती समोर आली. या संदर्भात सावधगिरीचा इशारा घेण्यासाठी खानापूर सरकारी दवाखान्यात चर्चा झाली.देशभरात कोरोनाच्या महामारीमुळे जनता हैराण झाली आहे. आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची दहशत जनतेला लागली आहे.यासंदर्भात खानापूर तालुक्यातील जनतेला सतर्क राहण्यासाठी येथील सरकारी दवाखाणन्यात चर्चा करण्यात आली.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजीव …
Read More »सीमाप्रश्नी पंतप्रधानांना पत्रं पाठवण्याच्या उपक्रमाला निलजी गावातुन युवकाचा पाठिंबा
बेळगाव (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने पंप्रधान नरेंद्र मोदींना हजारो पत्रं सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ९ ऑगष्ट क्रांती दिनी पाठवण्याचा जो संकल्प केलेला आहे, त्याला सीमाभागातून मोठा पाठिंबा मिळत आहे, आज सीमालढ्यात मोठं योगदान असलेल्या निलजी ता.बेळगाव गावातून हजारोने पत्रं पाठवण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी सुनील अष्टेकर, गोपाळ पाटील, …
Read More »चिखलाने माखला खानापूर डुक्करवाडी, मुडेवाडी, हत्तरगुंजी रस्ता
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील हत्तरगुंजी डुक्करवाडी, मुडेवाडी रस्ता चिखलाने माखला कारण यंदाच्या मुसळधार पावसाने तालुक्यात थैमान घातले. अनेक रस्त्याचे तीन तेरा वाजले असताना खानापूर डुक्करवाडी, मुडेवाडी, हत्तरगुंजी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.याबाबत माहिती अशी की, काही महिन्यांपूर्वी कंत्राटदाराने या रस्त्यावर केवळ शेडू मिश्रीत माती टाकून रस्त्याचे काम केले. त्यामुळेच …
Read More »मराठी भाषिकांनी जास्तीत जास्त पत्रे पाठवून सीमाप्रश्नाची जागृती करावी : समिती नेते आबासाहेब दळवी
कर्नाटकात मंत्रिमंडळाचे खातेवाटप; कत्ती यांच्याकडे वन व अन्न आणि नागरी पुरवठा खाते
शशिकला जोल्ले यांना धर्मादायसह हज व वक्फ खाते बेंगळुरू : कर्नाटकात मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर झाले आहे. मुख्यमंत्री बोम्मई यांनी महत्वाची खाती स्वत:कडेच ठेवली आहेत. मुख्यमंत्री बोम्मई यांनी अर्थ, बंगळूर विकास आणि मंत्रिमंडळ कामकाज यासह महत्वाची खाती स्वत:कडेच ठेवली आहेत. पहिल्यांदाच मंत्री बनलेल्या अरगा ज्ञानेंद्र यांच्याकडे गृह खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली …
Read More »पहिले पत्र पाठवून खानापूर युवा समितीच्या उपक्रमाचा शुभारंभ!
बेळगाव (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे 9 ऑगस्ट क्रांती दिनी हुतात्मा नागाप्पा होसूरकर यांच्या पत्नी तुळसा होसुरकर यांच्या हस्ते दुपारी 12 वाजता पहिले पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवून मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांसह सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे आजी-माजी लोकप्रतिनिधी व …
Read More »