संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर- अंकले रस्ता प्राथमिक शाळेला श्रीमती गोदाबाई कर्निंग मेमोरियल फौंडेशनतर्फे दोन तिजोरी, २० डेस्क, ३ ग्रिनबोर्ड, १ वाॅटर फिल्टर असे १ लाख २० हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सरकारी प्राथमिक शाळा वाचविण्यासाठी आता देणगीदारांनी पुढे येण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. येथील अंकले रस्ता कन्नड उच्च …
Read More »कणगला बैलगाडी शर्यतीत तासगांवचे प्रमोद थोरात यांची बैलजोडी प्रथम
संकेश्वर (प्रतिनिधी) : कणगला श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त करजगा रस्त्यावर बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यत पहाण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. येथील दुबैलगाडी शर्यतीत सात दुबैलगाडी सहभागी झाल्या होत्या. सात किलोमीटरचे अंतर फर्लांगभर अंतराने पार करीत तासगांवचे प्रमोद थोरात यांच्या बैलजोडींने प्रथम क्रमांकाचे बक्षिस पटकाविले. दुसऱ्या क्रमांकावर अथनीच्या शंकर …
Read More »संकेश्वरात श्री सिध्दी ट्रेडर्सचे थाटात उद्घघाटन
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर-हुक्केरी रस्ता येथे नव्याने प्रारंभ करण्यात आलेल्या श्री सिध्दी ट्रेडर्सचे उदघाटन उद्योजक अप्पासाहेब शिरकोळी, युवानेते पवन कत्ती यांचे हस्ते फित सोडून करण्यात आला. यावेळी बोलताना पवन कत्ती म्हणाले, श्री सिध्दी ट्रेडर्सने सर्व प्रकारचे लेटेस्ट टाईल्स, मार्बल, ग्रॅनाईट, सिरॅमिक उपलब्ध करुन नव्याने घर बांधणाऱ्या लोकांची उत्तम सोय केली …
Read More »समिती सोडून गेलेल्यांचा विचार न करता मराठीसाठी लढा तीव्र करुया : रणजीत पाटील
खानापूर : जे राजकीय स्वार्थासाठी समिती सोडून राष्ट्रीय पक्षात गेले त्यांचा विचार करत बसण्यापेक्षा आपण संविधानाने घालून दिलेल्या आपल्या मातृभाषेच्या न्याय हक्कासाठी व सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली लढा तीव्र करूया, असे प्रतिपादन खानापूर युवा समितीच्या बैठकीत ग्रामपंचायत सदस्य व मध्यवर्ती समितीचे सदस्य रणजीत पाटील यांनी केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी …
Read More »खानापूरात महाशिवरात्रीनिमित्त शिवालये सजली!
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरासह तालुक्यातील विविध गावातील शिवालये मंदिरे मंगळवारी दि. १ मार्च रोजी होण्याऱ्या महाशिवरात्रीच्या सणानिमित्त मंदिरातून रंगरंगोटी, सजावट, विद्युत रोषणाई आदीच्या कामाला सोमवारपासून सुरूवात करण्यात आली आहे. खानापूर शहरातील हेस्काॅम कार्यालयाच्या आवारात असलेल्या महादेवाच्या मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीच्या सणाचे औचित्य साधुन मंदिराची रंगरंगोटी, सजावट, विद्युत रोषणाई, मंडप …
Read More »आजपासून करंबळच्या धोंडदेव यात्रेला प्रारंभ
खानापूर (प्रतिनिधी) : करंबळ (ता. खानापूर) गावचे प्रसिद्ध ग्राम दैवत धोंडदेव यात्रेला मंगळवारी दि. २२ पासुन प्रारंभ झाली. दरवर्षा प्रमाणे सकाळी गावातील विविध देवदेवतांची मानकरीच्याहस्ते विधीवत पूजा होणार. त्यानंतर डोंगरावरील धोंडदेवाची मानकरी, पंचमंडळी, ग्रामस्थ याच्या उपस्थित विधिवत पुजा, ओटी भरणे, गार्हाणा घालणे आदी कार्यक्रम होऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. …
Read More »खानापूर युवा समितीकडून शिक्षकांचा सन्मान
बेळगाव : खानापूर तालुक्यातील शिक्षक प्रतिकूल परिस्थितीत ज्ञानदानाचे काम करीत आहेत. अशा शिक्षकांचा सत्कार करून युवा समिमीतीने त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन कणकुंबी हायस्कुलचे मुख्याध्यापक सुनील चिगुळकर यांनी केले. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे मराठी भाषा दिनानिमित्त रविवारी खानापूर तालुक्यातील उत्कृष्ट कार्य केलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात …
Read More »झुंजवाड के. एन. शिवारात ट्रॅक्टर पलटी झाल्याने शेतकरी ठार
खानापूर (प्रतिनिधी) : झुंजवाड के. एन. (ता. खानापूर) गावच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणीचे काम करत असताना रविवारी दि. २७ रोजी दुपारी बांधावरून ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टरखाली सापडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, झुंजवाड के. एन. येथील शेतकरी बसप्पा गणपती पाटील (वय ४६) हा रविवारी …
Read More »नंदगडात गवत गंजीला आग लागुन नुकसान
खानापूर (प्रतिनिधी) : सध्या कडक उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. त्यामुळे काही कारणाने आग लागण्याचे प्रकार वाढले आहेत. यात शेतकरी वर्गाच्या जनावरांच्यासाठी साठा केलेल्या शेतातील गवत गंज्याना आग लागण्याचे प्रकार दिसुन येत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गातून चिंतेच सावट पसरले आहे. असाच प्रकार रविवारी दि. २७ रोजी नंदगड (ता.खानापूर) गावच्या एपीएमसीच्या मागील …
Read More »मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावेत : प्रा. नानासाहेब जामदार
मोहनलाल दोशी विद्यालयात मराठी भाषादिन निपाणी (वार्ता) : ‘भाषेतील शब्दांची व्युत्पत्ती समजून घेणे हा आनंददायी उपक्रम आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या सभोवतालच्या शब्दांची व्युत्पत्ती जाणून घ्यावी. भाषेचे व्याकरण शब्दांची जडणघडण याचा सूक्ष्म अभ्यास करावा. जगातील अनेक देशांमध्ये मराठी भाषेचा वापर केला जातो. प्रत्येकाने आपल्या मातृभाषेवर प्रेम करून त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावेत, असे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta