Sunday , December 22 2024
Breaking News

कर्नाटक

कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

  बंगळूर : कर्नाटकमध्ये इंधनाच्या किमतीत तीन रुपयांहून अधिक वाढ झाली आहे, कारण राज्य सरकारने शनिवारी (ता. १५) पेट्रोल आणि डिझेलवरील कर वाढवला आहे, जो तत्काळ लागू होईल. शनिवारी राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार, कर्नाटक विक्रीकर (केएसटी) पेट्रोलवरील २५.९२ टक्क्यांवरून २९.८४ टक्के आणि डिझेलवर १४.३ टक्क्यांवरून १८.४ टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे …

Read More »

खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक बैठक संपन्न

  खानापूर : खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक बैठक सोमवार दिनांक 10 जून 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता संघटनेचे अध्यक्ष श्री. बनोसी सर यांच्या निरीक्षणाखाली संपन्न झाली. जनरल सेक्रेटरी श्री. पवार यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. …

Read More »

राज्यात ४५ हजार अतिथी शिक्षकांच्या नियुक्तीला अनुमती

  प्राथमिक ३५ हजार, माध्यमिक १० हजार शिक्षकांची नियुक्ती बंगळूर : शालेय शिक्षण विभागाने सरकारी प्राथमिक शाळांसाठी ३५ हजार आणि उच्च माध्यमिक शाळांसाठी १० हजार अशा एकूण ४५ हजार अतिथी शिक्षकांची नियुक्ती करण्यास परवानगी दिली आहे. राज्यातील सुमारे ४९ हजार ६७९ सरकारी शाळांमधील अनेक पदे दीर्घकाळापासून रिक्त आहेत. त्यामुळे सरकारी …

Read More »

सीमाभागासाठी राखीव जागेचा निर्णय ऐतिहासिक

  निपाणी विभाग म. ए. युवा समितीची बैठक; मराठीच्या संवर्धनासाठी प्रयत्न निपाणी (वार्ता) : कोल्हापूर मधील शिवाजी विद्यापीठाने सीमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांना पदवीत्तर शिक्षणामध्ये राखीव जागा व शैक्षणिक शुल्कात सवलत देऊन ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्याचा अनेक विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे. या पुढील काळातही मराठी भाषिकासह महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या …

Read More »

लैंगिक शोषण प्रकरणात भाजप नेते येडियुराप्पा यांना मोठा दिलासा, उच्च न्यायालयाने अटक वॉरंटला दिली स्थगिती

  बंगळुरू : कर्नाटक उच्च न्यायालयाने शुक्रवारी पोक्सो प्रकरणात माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या अटकेला स्थगिती दिली. येडियुराप्पा यांच्या याचिकेवर सुनावणी करत कर्नाटक उच्च न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत अटकेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र न्यायालयाने येडियुराप्पा यांना 17 जून रोजी तपासात सहभागी होण्याचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सीआयडीच्या …

Read More »

विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता खानापूर- जांबोटी बसच्या वेळेत बदल करावा

  खानापूर : आज सरकारी पूर्ण प्राथमिक शाळा ओलमणी व राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी यांच्यावतीने खानापूर बस डेपो मॅनेजर यांना निवेदन देण्यात आले. खानापूर जांबोटी मार्गावरील मोदेकोप, उतोळी, दारोळी या गावांमधील विद्यार्थी या दोन्ही शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. जवळजवळ 35 ते 40 विद्यार्थी हे शिक्षणाकरिता ओलमणीच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये …

Read More »

बालकामगार निषेध दिनी कुर्ली हायस्कूलमध्ये प्रबोधनपर नाटिका

  निपाणी (वार्ता) : रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात मिनी गुरुकुल विभागातर्फे जागतिक बाल कामगार निषेध दिन कार्यक्रम झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी बालकामगार निषेध याविषयी प्रबोधन पर नाटिका सादर केली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एस. चौगुले होते. ए. ए. चौगुले यांनी प्रास्ताविकात बाल कामगार निषेध दिनाचा उद्देश स्पष्ट केला. एम …

Read More »

निकृष्ट कामामुळे श्रीपेवाडी-लखनापूर पुलाचे नुकसान

  निकु पाटील यांचा आरोप: कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी निपाणी (वार्ता) : लखनापुर-श्रीपेवाडी या मार्गावर वाहनधारकासह शेतकऱ्यांची नेहमी वर्दळ असते. पण अत्यल्प निधीमुळे या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांची गैरसोय होत असल्याचा आरोप येथील टाऊन प्लॅनिंग कमिटीचे अध्यक्ष संयोजित उर्फ निकु पाटील यांनी पत्रकान्वये केला आहे. …

Read More »

ज्योती ॲथलांटिक स्पोर्ट्स क्लब बेळगावचे सुयश

  खानापूर : दिनांक 6 व 7 जून 2024 रोजी उडपी या ठिकाणी कर्नाटक राज्य पातळीवरील ॲथलांटिक चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धा उडपी जिल्हा हौशी ॲथलांटिक स्पर्धा संघटना उडपी यांच्यावतीने संपन्न झाल्या. या चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये कुमार वैभव मारुती पाटील व कुमार भूषण गंगाराम गुरव या खानापूर तालुक्यातील स्पर्धकांनी भाग …

Read More »

चन्नेवाडी ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीला निवेदन

  खानापूर : चन्नेवाडी ता.खानापूर येथील ग्रामस्थांनी क.नंदगड ग्रामपंचायतीचे विकासाधिकारी श्री. भीमाशंकर यांचेकडे अध्यक्ष, ग्रामविकासाधिकारी यांच्या नावे दोन मागण्यांची दोन निवेदने सादर केली. पहिल्या निवेदनात गेली काही वर्षे बंद असलेली प्राथमिक शाळा गावकऱ्यांच्या प्रयत्नातून १ जून पासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सद्यस्थितीत शाळा व अंगणवाडी एकाच खोलीत भरविली जात …

Read More »