बंगळूर : गेल्या २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत वरुणा विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विजयाच्या वैधतेला आव्हान देणारी निवडणूक याचिका उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. म्हैसूरमधील वरुणा विभागातील कुदनहळ्ळी गावातील रहिवासी के. एम. शंकर यांनी दाखल केलेल्या याचिकेत कथित निवडणूक गैरव्यवहाराच्या आधारे मुख्यमंत्र्यांची निवडणूक रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. शंकर …
Read More »सकल मराठा समाज जागृती सभेचे आज खनापूरात आयोजन
जगद्गुरु श्री मंजुनाथ स्वामीं उपस्थितीत राहणार खानापूर : खानापूर लक्ष्मी मंदिर या ठिकाणी आज दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता खानापुरातील मराठा समाज बांधवांसाठी सकल मराठा जागृती महासभेचे आयोजन करण्यात आले असून ही सभा पक्षविरहित आहे. सर्व राजकीय पक्षातील मराठा समाज बांधवांनी व मराठा समाजाच्या प्रमुख व्यक्तींनी …
Read More »दहशतवादी हल्ल्यात कर्नाटकातील पर्यटकांचा मृत्यू
मुख्यमंत्र्यांची आपत्कालीन बैठक; अधिकारी काश्मीरला रवाना बंगळूर : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी कर्नाटकातील नागरिकांना लक्ष्य केल्याची बातमी मिळताच, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सरकारच्या मुख्य सचिवांची आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माहिती गोळा केली आणि त्यांना त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, पोलिस अधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांचे एक पथक काश्मीरला …
Read More »शिवस्मारक इमारतीला तडे; तातडीने वृक्ष हटवण्याचे आमदार हलगेकर यांचे आदेश
खानापूर : खानापूर येथील “राजा श्री शिवछत्रपती शिवस्मारक” इमारतीच्या मागील बाजूला जुन्या कोर्ट आवारातील. एका मोठ्या झाडांची मुळे आणि बुंध्यामुळे इमारतीला तडे गेले आहेत. मागील दोन वर्षांपासून हे धोकादायक वृक्ष हटविण्याची मागणी शिवस्मारक ट्रस्टच्या वतीने करण्यात येत आहे. परंतु, या आवारातील बेकायदेशीर बांधकामांना वाचवण्यासाठी तालुका पंचायतीकडून टाळाटाळ केली जात …
Read More »निवृत्त आयजीपी ओम प्रकाश यांची हत्या मालमत्तेच्या वादातून…
बेंगळुरू : निवृत्त आयजीपी ओम प्रकाश यांच्या हत्येमागील रहस्य उलगडण्यात आले आहे. संपूर्ण राज्यातील पोलीस दलाला हादरा देणाऱ्या या घटनेमुळे पोलीस खाते हादरले आहे. एका कर्तव्यदक्ष निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची अखेर कौटुंबिक कलाहातून झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी ओम प्रकाश यांच्या क्रूर हत्येने संपूर्ण राज्य …
Read More »निवृत्त डीजी-आयजीपी ओम प्रकाश यांच्या हत्येप्रकरणी पत्नी, मुलीविरुद्ध एफआयआर दाखल
बेंगळुरू : कर्नाटक राज्याचे निवृत्त डीजी-आयजीपी ओम प्रकाश यांच्या हत्येप्रकरणी पत्नी आणि मुलीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. निवृत्त डीजी-आयजीपी ओम प्रकाश यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या मुलाने आपली आई पल्लवी आणि धाकटी बहीण क्रिती यांनी ही हत्या केल्याचा संशय व्यक्त करून ओम प्रकाश यांचा मुलगा कारतिकेश याने बेंगळुरू येथील एचएसआर …
Read More »निवृत्त राज्य पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या
पत्नीकडूनच हत्या झाल्याचा संशय बंगळूर : निवृत्त पोलिस महासंचालक (डीजी आयजीपी) ओम प्रकाश यांची त्यांच्याच पत्नीने चाकूने वार करून हत्या केली. ही घटना बंगळुरमधील एचएसआर लेआउटमधील एका घरात घडली. कर्नाटक केडरचे १९८१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी ओम प्रकाश यांनी राज्याचे डीजी आणि आयजीपी म्हणून काम केल्यानंतर २०१५ मध्ये निवृत्ती घेतली. …
Read More »ननदी येथील श्री हालसिद्धनाथ यात्रेनिमित्त भव्य ढोल वादन स्पर्धेचे उद्घाटन
ननदी (प्रतिनिधी) : चिकोडी तालुक्यातील ननदी येथील जागृत देवस्थान ग्रामदैवत व कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागातील भाविकांचे श्रद्धास्थान श्री हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेत आज शुक्रवार दिनांक 18 रोजी रात्री आठ वाजता भव्य ढोल वादन स्पर्धेचे उद्घाटन श्रीमंत सरकार अजितसिंह निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यात्रेचा मुख्य दिवस दिनांक 19 एप्रिल रोजी …
Read More »जातनिहाय जनगणती अहवाल : निर्णय न होताच मंत्रिमंडळ बैठकीची सांगता
लेखी अभिप्राय देण्याची सूचना; अहवालावर मंत्र्यांमध्ये मतभेद बंगळूर : जात जनगणना अहवाल लागू करण्यासाठी बोलावलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. या अहवालावर मंत्र्यांमध्ये मतभेद असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बैठकीत निश्चित स्वरूपाचा कोणताच निर्णय न घेता, सर्व मंत्र्यांना लेखी अभिप्राय देण्यास सांगून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बैठक आटोपती …
Read More »ननदी येथील श्री हालसिद्धनाथ यात्रा 16 ते 21 एप्रिलपर्यंत
ननदी (प्रतिनिधी) : चिकोडी तालुक्यातील ननदी येथील जागृत देवस्थान ग्रामदैवत व कर्नाटक – महाराष्ट्र सीमाभागातील भाविकांचे श्रद्धास्थान श्री हालसिद्धनाथ देवाची यात्रा बुधवार दिनांक 16 रोजी सायंकाळी आठ वाजता श्रीमंत सरकार अजितसिंह निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली व विजयसिंह निंबाळकर व विजयसिंह देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कर बांधून सुरुवात करण्यात आली. यात्रेचा मुख्य …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta