निपाणीत शुभेच्छांचा वर्षाव निपाणी (वार्ता) : चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील निपाणी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी आपल्यावर विश्वास ठेवून लोकसभेमध्ये पाठवले आहे. त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी निपाणी मतदारसंघाचा विकासाच्या माध्यमातून कायापालट करण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही नूतन खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी दिली. खासदारपदी निवड झाल्यानंतर प्रियांका जारकी होळी यांनी पहिल्यांदाच निपाणी मतदारसंघात …
Read More »मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवराज्याभिषेक दिन सोहळा
निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुरुवारी (ता.६) शिवसेनेतर्फे शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी पांडुरंग वडेर यांच्या पौरोहित्याखाली सुरेश कुरणे यांच्या हस्ते पूजा झाली. त्यानंतर मान्यवरांच्या यांच्या हस्ते शिवपुतळ्यास अभिषेक घालण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब खांबे व विजयराजे …
Read More »भेदभाव न करता विकास कामे राबवणार : खासदार प्रियांका जारकीहोळी
शरद पवार राष्ट्रवादी गटातर्फे सत्कार निपाणी (वार्ता) : आपल्या विजयामध्ये निपाणी मतदारसंघातील नेते मंडळी कार्यकर्ते व मतदारांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. सहकारत्न उत्तम पाटील यांनी आपल्या बहिणीला निवडून दिले आहे. याची जाणीव ठेवून काँग्रेससह राष्ट्रवादी पक्षाची कामे वडिलांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे. लवकरच निपाणी आणि चिकोडी येथे कार्यालय सुरू करून सर्वांच्या …
Read More »बी. नागेंद्र मंत्रिपदाचा राजीनामा देणार
बेंगळुरू : वाल्मिकी विकास महामंडळातील मोठ्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर बी. नागेंद्र यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देणार असून ते आज सायंकाळी 7.30 वाजता मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्याची शक्यता आहे. कर्नाटक राज्य काँग्रेस सरकारने वाल्मिकी महामंडळात 87 कोटी रुपयांची लूट केली. या घोटाळ्यात मंत्री बी. नागेंद्र यांचा हात असल्याचा आरोप विरोधकांनी यापूर्वीच केला होता …
Read More »राष्ट्रीय महामार्गावर वृक्षारोपण कधी?
वाहनधारकांना त्रास; प्राधिकरणाने वृक्ष लागवड करण्याची मागणी ; जागतिक पर्यावरण दिन विशेष निपाणी (वार्ता) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर सध्या सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. याशिवाय रस्त्यावरील गावाजवळ उड्डाणपूल उभारणीचे काम चालू आहे. त्या पार्श्वभूमीवर वर्षांपूर्वीच रस्त्याकडेची झाडे तोडली आहेत. मात्र या राष्ट्रीय महामार्गाच्या महामार्ग प्राधिकरणाने पावसाळ्यापूर्वी वृक्ष …
Read More »प्रियांका जारकीहोळी यांच्या विजयामुळे निपाणीत कार्यकर्त्यांचा जल्लोष
निपाणी (वार्ता) : लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी (ता.४) जाहीर झाला. त्यापार्श्वभूमीवर नागरिकांनी दूरचित्रवाणी आणि प्रसार माध्यमावर निकाल पाहत घरीच बसल्याने सकाळी रस्त्यावर शुकशुकाट होता. दुपारी काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका सतीश जारकीहोळी या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्यानंतर येथील काँग्रेस कार्यालयासह चौका चौकात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. …
Read More »प्रज्ज्वल रेवन्ना यांचा दारुण पराभव
बंगळुरू : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच कर्नाटकातून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रज्ज्वल रेवन्ना यांचा पराभव झाला आहे. हसन मतदार संघातून पराभव त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. येथून काँग्रेसचे उमेदवार श्रेयस पटेल विजय झाले आहेत. प्रज्ज्वल रेवन्ना यांना 502297 मेते मिळाली आहेत. तर 529857 मेते मिळून …
Read More »अटकेच्या भीतीने भवानी यांनी घेतली उच्च न्यायालयात धाव
बंगळूर : महिलेच्या अपहरणप्रकरणी अटकेच्या धोक्यात असलेल्या भवानी रेवण्णा यांना अटकपूर्व जामीन नाकारण्याच्या सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारा अर्ज उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. एसआयटीने जारी केलेल्या नोटीसमध्ये कोणत्याही वैधानिक तरतुदीचा उल्लेख नाही. अटक होण्याची भीती भवानी रेवण्णा यांनी अर्जात व्यक्त केली आहे. के.आर.वली आणि सुनावणीला उपस्थित राहण्याचे …
Read More »अखेर चन्नेवाडी शाळेची घंटा वाजली…
खानापूर : चन्नेवाडी ता.खानापूर येथील गेल्या आठ वर्षांपासून बंद झालेल्या शाळेला आज सुरुवात झाली. गेल्या महिन्याभरापासून पालक व गावकऱ्यांनी तालुका गट शिक्षणाधिकारी श्रीमती राजश्री कुडची यांची भेट घेऊन शाळा पुन्हा सुरू करण्यासंदर्भात निवेदन दिले होते, त्यानंतर बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी श्री. मोहनकुमार हंचाटे यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. या …
Read More »बेंगळुरूमध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस; शेकडो झाडे उन्मळून पडली
बंगळुरु : कर्नाटकच्या किनारपट्टीच्या भागात मान्सून धडक देण्यापूर्वी मुसळधार पावसानं बंगळुरुला झोडपून काढलं आहे. रविवारी रात्री बंगळुरुत मुसळधार पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळं जनजीवन विस्कळीत झालं होतं. रविवारी बंगळुरु झालेल्या मुसळधार पावसानं आणि वादळी वाऱ्यानं शहरात काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली होती. रविवारचा दिवस बंगळुरुसाठी सर्वाधिक पावसाचा दिवस ठरला. …
Read More »