Thursday , September 19 2024
Breaking News

देश/विदेश

अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांना 6 महिन्याची शिक्षा; न्यायालयाने ठोठावला 5000 चा दंड

  चेन्नई : प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या माजी खासदार जया प्रदा यांना चेन्नई न्यायालयाने 6 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. चेन्नई मधील रायपेटमध्ये जया प्रदा यांचे स्वत:च्या मालकीचे थिएटर आहे. त्यांच्या थिएटरमधील कर्मचाऱ्यांनी केलेल्या याचिकेप्रकरणी जया प्रदा यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच जयाप्रदा यांना 5,000 रुपयांचा दंडही …

Read More »

‘इंडिया’ आघाडीविरोधातील याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

  निवडणूक आयोगाकडे जाण्याचा कोर्टाचा सल्ला नवी दिल्ली: देशातील विरोधकांच्या 26 पक्षांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला आव्हान दिले आहे. त्यासाठी विरोधकांनी आघाडीला ‘इंडिया’ असे नाव दिले आहे. विरोधकांच्या या आघाडीच्या इंडिया या नावाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम …

Read More »

अमित शाह खोट बोलले, राहुल गांधी यांच्यामुळेच माझं आयुष्य बदललं : कलावती बांदूरकर

  यवतमाळ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना यवतमाळ जिल्ह्यातील कलावती बांदूरकर यांनी मदत केल्याचा दावा फेटाळला आहे. अमित शहा यांनी कलावती यांच्याबाबत जे वक्तव्य केलं, त्याला प्रत्युत्तर देताना कलावती यांनी मला मोदी किंवा भाजप सरकारमुळे काहीच मिळालं नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यामुळेच माझं आयुष्य बदललं, अशी माहिती दिली …

Read More »

मणिपूरमध्ये लवकरच शांतीचा सूर्य उगवेल, दोषींना सोडणार नाही, मणिपूरवासियांच्या मागे देश ठामपणे उभा; नरेंद्र मोदींचा विश्वास

  नवी दिल्ली : मणिपूरमध्ये जे काही चाललं आहे ते दुर्दैवी असून दोषींना कडक शिक्षा देण्यात येईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत सांगितलं. मणिपूरमध्ये लवकरच शांतीचा सूर्य उगवेल, मणिपूरच्या मागे देश ठाम उभा आहे असंही ते म्हणाले. मणिपूरची आजची स्थिती ही काँग्रेसच्या काळात निर्माण झाल्याचा आरोपही मोदींनी केला. …

Read More »

रेट रेपो जैसे थे… भारत जगाचं ग्रोथ इंजिन बनेल; आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा दावा

  नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठक पार पडली. 8 ऑगस्टपासून सुरू झालेल्या सहा सदस्यीय एमपीसीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली आहे. ते म्हणाले की, यावेळीही पॉलिसी रेट म्हणजेच, रेपो रेट कायम ठेवण्यात आला आहे. म्हणजेच, सध्या रेपो रेट 6.5 टक्केच असणार …

Read More »

अविश्वास प्रस्तावावरील मतदानासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून व्हिप जारी!

  नवी दिल्ली : मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन व्हिप निघाले आहे. दोन्ही व्हीपची प्रत एबीपी माझाकडे आहे. एकीकडे अजित पवार गटाकडून सुनील तटकरे यांनी व्हिप काढला आहे तर दुसरीकडे शरद पवार गटाचे मोहम्मद फझल यांनी देखील व्हिप काढला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार लोकसभेत मोदी सरकारच्या …

Read More »

गृहिणींचे बजेट कोलमडणार! डाळींच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता

  सर्व डाळींच्या उत्पादनांत यंदा मोठी घट नवी दिल्ली : किराणा मालाच्या भावात मागील महिन्याभरापासून खूप वाढ होत चाललीये. अशातच आता केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सर्व प्रकारच्या डाळींच्या उत्पादनांत यंदा चार लाख टनांची घट होणार असल्याचं समोर आलंय. तसंच यावर्षी सर्व प्रकारच्या डाळींच्या लागवडीत नऊ टक्क्यांची घसरण आहे . तर …

Read More »

महाराष्ट्रातील युती ठाकरेंनी तोडली, भाजपनं नाही; पंतप्रधान मोदी

  नवी दिल्ली: महाराष्ट्रातील युती ठाकरेंनी तोडली, भाजपनं नव्हे असं पंतप्रधान मोदी एनडीए खासदारांच्या बैठकीत म्हणाले. एनडीएमधून बाहेर पडलेल्या पक्षांचा देखील त्यांनी दाखला दिला. यापुढे देखील आपल्याला एनडीए म्हणून काम करायचं आहे, काँग्रेसप्रमाणे भाजप अहंकारी नाही, त्यामुळे भाजप सत्तेवरून पायउतार होणार नाही, असंही मोदी म्हणाल्याचं कळतंय. काँग्रेसच्या स्वार्थामुळे प्रणव मुखर्जी, …

Read More »

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट नाहीत’; शरद पवारांचे निवडणूक आयोगाला उत्तर

  अजित पवार केवळ संभ्रम निर्माण करत आहेत मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध आहे त्यात कोणतीही फूट पडलेलली नाही. पक्षात दोन गट पडलेले नाहीत, शिवाय कोणतेही वाद नाहीत अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणूक आयोगाकडे मांडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा आहे असा दावा अजित पवार …

Read More »

दिल्लीतील एम्स रुग्णालयाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

  नवी दिल्ली : दिल्लीतील एम्स रुग्णालयाला भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पीटीआयने ट्वीट करत या संदर्भात माहिती दिली आहे. पीटीआयने ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ‘दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या इमारतीला आग लागली आहे.’ मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील एम्सच्या एंडोस्कोपी कक्षात आग लागल्याची …

Read More »