नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०२४ चा निकालाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली आहे. उद्या निवडणुकांचा निकाल येणार आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यावर्षी ६४ कोटी लोकांनी मतदान केल्याचं सांगितलं आहे. तसंच यावर्षी ३१.४ कोटी महिला मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
राजीव कुमार म्हणाले की, आतापर्यंत आम्ही १०० प्रेस नोट काढल्या. ३१.४ कोटी महिला मतदारांनी मतदान केलं आहे. उद्या होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली आहे. यावेळी निवडणूक आयोगाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण झाल्याचं देखील राजीव कुमार यांनी सांगितलं आहे.
महिलांबाबत कोणत्याही राजकीय पक्षाकडून चुकीचा शब्द निघायला नको, अशी आमची भूमिका होती. आम्ही त्यासाठी कडक सूचना केल्या होत्या, असं राजीव कुमार यांनी सांगितलं होतं. निवडणूक कर्मचाऱ्यांना घेऊन जाण्यासाठी १३५ ट्रेनचं नियोजन केलं होतं. १६९२ कर्मचारी हेलिकॉप्टरने पोहोचल्याची माहिती त्यांनी दिली आहे. देशातील असा कुठलाही कोपरा नाही की, तिथे निवडणूक कर्मचारी पोहोचले नाहीत, असं राजीव कुमार यांनी सांगितलं आहे.
मतमोजणी दरम्यान काय काय काळजी घ्यायची आहे, त्याची प्रोसेस ठरल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं आहेत. १०.३० लाख बूथ आहेत. प्रत्येक हॉलमध्ये ४ टेबल आहेत. प्रत्येक पक्षाचा पोलिंग प्रतिनिधी असेल. ही सगळी प्रोसेस ७० ते ८० लोकांमध्ये होत आहे. सिस्टिममधे कुठलीही चूक होऊ शकत नाही. प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही लावल्याची माहिती त्यांनी दिली आहे.