राजस्थानमध्ये एका आईने आपल्या चार लेकरांची निर्घृणपणे हत्या केली आहे. त्यानंतर स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला. महिलेने पाण्याच्या टाकीत उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
महिला आत्महत्या करताना शेजारच्या एका व्यक्तीने तिला पाहिले. त्यानंतर त्याने आरडाओरडा करुन सर्वांना बोलावले. आरडाओरडा ऐकून गावातील इतर लोक घटनास्थळी पोहचले. लोकांनी महिला आणि तिच्या मुलांना टाकीतून बाहेर काढले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांना या चारही मुलांना मृत घोषित केले.
बामेरच्या धाणे तालुक्यातील तळा या गावात ही घटना घडली आहे. रविवारी ४ वाजता ही घडली आहे. मात्र, रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली. चार मुलांचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियानी माहिती दिली आहे. चारही मुलांच्या आईनेच त्यांना टाकीत घालून मारले, असं त्यांनी सांगितले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेली.
हेवा देवी असे आईचे नाव आहे. तर संजू (वय ९), मंजू (वय ११), दिनेश (वय ५), कृष्णा (वय ७) असे मृत मुलांचे नाव आहे. याप्रकरणी प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ती महिला मुलांना घेऊन शेतात आली होती. तिने मुलांना पाण्याच्या टाकीत ढकळले.
कौटुंबिक वादातून ही हत्या झाली असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. महिला तिच्या मुलांसह शेतात जात असताना तिचा सासू-सासऱ्यांसोबत जोरदार वाद झाला. तिचा नवरा मजुरीचे काम कारतो. घरी भांडण झाले त्याच रागातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिस पुढील कारवाई करत आहेत.