बंगळूर : काँग्रेसने विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली असून, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतिंद्र सिद्धरामय्या यांच्यासह ७ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १३५ जागा जिंकल्या होत्या, त्या आधारावर काँग्रेसला ११ पैकी ७ जागांवर विजय मिळवण्याची संधी आहे आणि त्यांनी आता त्या जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मुलगा यतींद्र, विद्यमान मंत्री एन. एस. बोसराजू, मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव डॉ. के. गोविंदराजू, वसंत कुमार, जगदेव गुत्तेदार, इव्हान डिसोझा आणि बिल्किस बानो यांना काँग्रेसचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे.
पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा
काँग्रेसने परिषदेच्याच केवळ सात जागासांठीच नाही, तर जगदीश शेट्टर यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठीही उमेदवार जाहीर केला आहे. आगामी पोटनिवडणुकीसाठी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बसनगौडा बदर्ली यांची निवड करण्यात आली आहे.