Wednesday , April 22 2026
Breaking News

यळेबैल येथे स्वराज मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचा उद्घाटन सोहळा उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : यळेबैलमध्ये स्वराज मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड यळेबैल सोसायटीचा उद्घाटन कार्यक्रम सोहळा संपन्न झाला. रविवार दिनांक 2 जून 2024 रोजी सकाळी 12 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सोसायटीचे चेअरमन श्री. राजाराम लक्ष्मण यळ्ळूरकर त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामस्थ पंच कमिटी चेअरमन यळेबैल श्री. वैजू जकाप्पा पाटील उपस्थित होते. त्याचबरोबर ग्रामस्थ पंच कमिटी यळेबैल व्हा. चेअरमन श्री. कल्लाप्पा पाटील उपस्थित होते व समस्त सर्व ग्रामस्थ पंच कमिटी सदस्य उपस्थित होते.

सोसायटीचे व्हा. चेअरमन श्री. राजाराम गुंडू पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ग्रामस्थ पंच कमिटी यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर सरस्वती फोटो पूजन छत्रपती शिवाजी महाराज फोटो पूजन करण्यात आले. विद्यार्थिनींच्या स्वागतगीतातून उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी श्री. नामदेव मरगाळे ग्रामस्थ पंच कमिटी सेक्रेटरी व श्री. राजाराम लक्ष्मण यळ्ळूरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उद्घाटनाचे औचित्य साधून काही विशेष ठेव योजनांचे आयोजन करण्यात आलें होते. त्या योजनेचा लोकांनी लाभ घेतला. या कार्यक्रमाच्यावेळी समस्त पंच कमिटी सदस्य गावकरी सोसायटी सदस्य सल्लागार कमिटी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नाथाजी मरगाळे यांनी केले. श्री. मोहन शहापूरकर यांनी आभार मानून कार्यक्रमाचे सांगता केली.

About Belgaum Varta

Check Also

बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Spread the love  किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *