Tuesday , September 17 2024
Breaking News

देश/विदेश

“पाकव्याप्त काश्मीर परत मिळवायला भारताला फार कष्ट पडणार नाहीत”, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं मोठं विधान!

  नवी दिल्ली : गेल्या काही दशकांपासून पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा पूर्ण काश्मीरप्रमाणेच चर्चेचा आणि वादाचा राहिला आहे. स्वातंत्र्यानंतर झालेल्या युद्धामध्ये पाकिस्ताननं काश्मीरचा हा भाग बळकावला. तेव्हापासून पाकव्याप्त काश्मीर हा दोन्ही देशांमध्ये वादाचा मुद्दा राहिला. भारतात आजपर्यंत सत्तेत आलेल्या सरकारांना पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारतीय भूमीचा भाग करण्यात अपयश आलं असताना विरोधी …

Read More »

गंजममध्ये भीषण बस अपघातात १० ठार, ८ जखमी

  गंजम : ओडिशा गंजम जिल्ह्यात रात्री एक भीषण अपघात झाला. यामध्ये १० लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तर आठ अन्य जण जखमी झालेल्यांना बरहमपूरच्या एमकेसीजी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. विशेष मदत आयुक्तांनी ही माहिती दिली आहे. गंजमच्या डीएम दिव्या ज्योती परिदा यांनी सांगितले की, दोन …

Read More »

हिमाचल प्रदेशमध्‍ये पावसाचा कहर, मंडी जिल्‍ह्यात माेठे नुकसान

  मंडी : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर सुरूच आहे. मुसळधार पावसामुळे मंडी जिल्ह्यातील सेराज खोऱ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सेरज येथील तुंगाधर येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात अनेक वाहने वाहून गेली. कुल्लू जिल्हा मुख्यालयाजवळील दोहरनाला भागात शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मोहल खड्डामध्ये पूर आला होता. हिमाचल प्रदेश राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये …

Read More »

मणिपूरमध्ये पुन्हा ३० जूनपर्यंत इंटरनेटवर बंदी

  नवी दिल्ली : गेले दीड महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार आणि तणावाचे वातावरण कायम आहे. दिवसेंदिवस येथील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढच होत आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव पुन्हा एकदा मणिपूरमधील इंटरनेट सेवेवर ३० जूनच्या दुपारपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. मणिपूरात गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात आत्तापर्यंत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला …

Read More »

भाजपला सत्तेतून पायउतार करण्याचा निर्धार

  पाटण्यात एकवटले देशातील 15 विरोधी पक्षनेते पाटणा : येत्या लोकसभेच्या निवडणुकीतल देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन भाजपला सत्तेतून पायउतार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधी पाटण्यात आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली देशातील प्रमुख विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये देशातील विरोधी पक्षांनी किमान समान कार्यक्रमाची तयारी करण्याचा निर्णय घेतला. …

Read More »

काँग्रेसची भारत जोडण्याची तर भाजपची देश तोडण्याची विचारधारा, राहुल गांधींचा हल्लाबोल

  पटना : देशात विचारधारेची लढाई सुरु आहे. एकीकडं काँग्रेसची भारत जोडण्याची विचारधारा आहे, तर दुसरीकडं भाजप आणि आरएसएसची भारत तोडण्याची विचारधारा असल्याचे वक्तव्य काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलं. भारताला तोडण्याचे काम भाजप करत असल्याचा हल्लाबोल राहुल गांधींनी केला. आज पाटण्यात भाजपविरोधी 23 पक्षांची बैठक होत आहे. या बैठकीसाठी …

Read More »

कुपवाडात लष्कर-पोलिसांची मोठी कारवाई; चार दहशतवाद्यांचा खात्मा

  जम्मू : कुपवाड्यातील मछल सेक्टरमधील काला जंगलमध्ये भारतीय लष्कर आणि पोलिसांकडून आज (२३ जून) सकाळी मोठी कारवाईत करण्यात आली आहे. या संयुक्त कारवाईत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधून भारतात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधी भारतीय लष्कराकडून ही …

Read More »

टायटॅनिकचे अवशेष पाहायला गेलेल्या अब्जाधीशांचा दुर्दैवी मृत्यू, जहाजाजवळ सापडले पाणबुडीचे तुकडे

  तब्बल ११२ वर्षांपूर्वी अटलांटिक महासागराच्या तळाशी हरवलेल्या टायटॅनिक या अजस्र जहाजाच्या अवशेषांच्या अभ्यास मोहिमेवर गेलेली टायटन ही पाणबुडी चार दिवसांपासून बेपत्ता होती. केवळ ९६ तास पुरेल इतका प्राणवायूचा साठा घेऊन ही पाणबुडी रविवारी (१८ जून) समुद्राच्या तळाशी झेपावली होती. परंतु काहीच तासांनी या पाणबुडीचा संपर्क तुटला. त्यानंतर ही पाणबुडी …

Read More »

अमेरिकेत पंतप्रधान मोदींविरोधात ‘गो बॅक मोदी’चा नारा, “मोदी खूनी आहेत” म्हणत नागरिकांकडून निषेध

  पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवस अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जंगी स्वागत केलं आहे. राष्ट्राध्यक्षांचं अधिकृत निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये नरेंद्र मोदींचा पाहुणचार करण्यात आला. यावेळी केलेल्या भाषणातून मोदींनी जो बायडेन यांचे आभार मानले. स्थानिक वेळेनुसार, आज दुपारी पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या …

Read More »

भाजपा मुस्लिमांना ‘मोदी मित्र’ प्रमाणपत्राने गौरविणार; ६५ लोकसभा मतदारसंघात ५० हजार मुस्लीम हितचिंतक तयार करणार

  नवी दिल्ली : पुढील वर्षी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून अल्पसंख्याक समाजात पक्षाचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम, दृष्टी आणि पुढाकाराचे कौतुक करणाऱ्या लोकांना ‘मोदी मित्र’ असे प्रमाणपत्र देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. जानेवारी महिन्यात भाजपाने अल्पसंख्याक समाजापर्यंत पोहोचण्यासाठी हे नवे मिशन …

Read More »