Sunday , May 3 2026
Breaking News

देश/विदेश

पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल

  झिंदवाडा : मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्याच कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. गुन्हा केल्यानंतर त्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. महुलझीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोदल कछार गावात ही घटना घडली आहे. …

Read More »

पापुआ न्यू गिनीमध्ये भीषण दुर्घटना; दरड कोसळून २००० हून जास्त लोकांचा मृत्यू!

  इंडोनेशियाच्या सीमेला लागून असलेल्या पापुआ न्यू गिनीमध्ये शुक्रवारी घडलेल्या भीषण दुर्घटनेतील मृतांची संख्या २०००च्या वर गेली आहे. शुक्रवारी पापुआ न्यू गिनीमधील एंगा प्रांतातल्या यांबली गावात मोठी दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. दरड कोसळल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते. ही दरड एवढी मोठी होती की त्यातून खाली आलेल्या मलब्याखाली …

Read More »

दिल्‍लीत बेबी केअर सेंटरला भीषण आग; ६ नवजात बालकांचा होरपळून मृत्‍यू

  नवी दिल्‍ली : पूर्व दिल्लीतील विवेक विहार येथे (शनिवार) रात्री बेबी केअर सेंटरला लागलेल्या भीषण आगीत 6 मुलांचा होरपळून मृत्यू झाला. रात्री उशिरा 12 मुलांची सुटका करण्यात आली, त्यापैकी 6 मुलांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णालयात सध्या 6 मुले दाखल आहेत, एका मुलाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. दिल्ली अग्निशमन …

Read More »

राजकोटमधील गेमिंग झोनमध्ये ‘अग्नितांडव’; 30 जणांचा होरपळून मृत्यू, मृतांमध्ये 12 लहान मुले

  राजकोट : शनिवारी (25 मे 2024) टीआरपी गेम झोनमध्ये भीषण आग लागली. या आगीत 30 लोकांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. राजकोटमधील गेम झोन हे गर्दीचं ठिकाण असल्यानं आग लागली …

Read More »

राजकोटमधील गेमिंग झोनमध्ये भीषण आग; दहा जणांचा मृत्यू

  राजकोट : गुजरातच्या राजकोटमधील गेमिंग झोनमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये तब्बल १० लोकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचं पोलिस आयुक्तांनी सांगितलं. ”आगीमागचं नेमकं कारण काय, याचा तपास सुरु असून शहरातील सगळे गेमिंग झोन बंद करण्याचे आदेश दिले आहेत” अशी माहिती पोलिस आयुक्तांनी …

Read More »

गुगल मॅप्सच्या भरवशावर फिरायला निघाले, पण थेट कालव्यात जाऊन पडले

  केरळमध्ये सध्या जोरदार पाऊस पडतोय. अनेक ठिकाणी पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या दुर्घटना घडल्या असून यात ११ जणांचा बळी गेला आहे. अशातच केरळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. दक्षिण केरळ जिल्ह्यातील कुरुप्पनताराहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणारी एक कार खोल कालव्यात कोसळली आहे. या कारमधून …

Read More »

केरळमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा कहर; अनेक सेवा विस्कळीत

  मोसमी पाऊस ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्यामुळे मोसमी पाऊस केरळमध्ये वेळेत दाखल होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने काही दिवसांपूर्वी म्हटले होते. त्यानंतर आता केरळमध्ये मान्सूनपूर्व पाऊस दाखल झाला असून पावसामुळे अनेक सेवा विस्कळीत झाल्या आहेत. तसेच केरळमधील …

Read More »

सहाव्या टप्प्यासाठी आज मतदान; सहा राज्यांतील ५८ जागांचा समावेश

  नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज, शनिवारी सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील ५८ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. दिल्लीतील सर्व सात आणि हरियाणातील सर्व दहा जागांवर मतदान होणार असून सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. या ५८ मतदारसंघांमध्ये ११.१३ कोटी मतदार असून ५.८४ कोटी पुरुष व ५.२९ …

Read More »

नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी

  सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांना मोठा झटका बसला आहे. दिल्लीच्या साकेत न्यायालयाने शुक्रवारी (24 मे) 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात त्यांना दोषी ठरवले आहे. तत्कालीन केवायआयसी चेअरमन व्हीके सक्सेना (आता दिल्लीचे नायब राज्यपाल) यांनी पाटकरांविरोधात याचिका दाखल केली होती. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, साकेत न्यायालयाचे …

Read More »

२२ जणांची हत्या करणारा किस्सू तिवारी रामलल्लाच्या दर्शनाला; पोलिसांनी केली अटक

  मध्य प्रदेशच्या कटनी जिल्ह्यात २२ हत्या करणारा मोस्ट वाँटेड आरोपी किशोर तिवारी उर्फ किस्सू तिवारी याला पोलिसांनी नाट्यमय पद्धतीने अटक केली आहे. किस्सू तिवारी अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी आला होता. तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली. मध्य प्रदेश पोलिसांनी त्याच्यावर ५५ हजारांचं बक्षीसही जाहीर केलं होतं. किस्सू तिवारीला अटक करण्यात आली …

Read More »