वाराणसी : ज्ञानवापी प्रकरणात मुस्लिम पक्षाला मोठा झटका बसला आहे. व्यासांच्या तळघरात पूजा सुरु राहील असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. तळघरात पूजा सुरु ठेवण्याच्या वाराणसी कोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. सोबतच सर्वोच्च न्यायालयाने हिंदू पक्षाला नोटीसही पाठवली आहे. कोर्टाने सद्य स्थितीबाबत आदेश देताना मशिदीची गुगल अर्थ इमेज सादर करायला सांगितली आहे. आज झालेल्या सुनावणीत मुस्लिम पक्षाचे वकील हुजैफा अहमदी म्हणाले की, “उच्च न्यायालयाने दिलासा दिला नाही. तिथे पूजा सुरु आहे. मागच्या 30 वर्षांपासून पूजा झाली नव्हती” सत्र न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती द्यावी. पूजेच ठिकाण मशीद परिसरात आहे. त्यासाठी परवानगी देण योग्य नाही असं मुस्लिम पक्षाचे वकील म्हणाले.
“1993 पासून ताबा आमच्याकडे होता. मागच्या 30 वर्षांपासून पूजा होत नव्हती. त्यावर बंदी घातली पाहिजे” असं अहमदी म्हणाले. त्यावर सीजेआयने सांगितलं की, ‘हायकोर्टाला असं आढळून आलय की, ताबा व्यास कुटुंबाकडे होता’
ही मशिदीची जागा आहे
त्यावर अहमदी म्हणाले की, “हा त्यांचा दावा आहे. याला कुठलाही साक्षीदार नाहीय. ही मशिदीची जागा आहे. मला इतिहासात नाही जायचय. असा आदेश सिविल कोर्ट कसं देऊ शकतं?”अहमदी यांनी सुप्रीम कोर्टासमोर युक्तीवाद करताना सांगितलं की, “1993 ते 2023 पर्यंत कुठलीही पूजा होत नव्हती. 2023 मध्ये दावा करण्यात आला. त्यावर न्यायलायने आदेश दिला”