Monday , December 15 2025
Breaking News

बेळगाव

जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवार यांच्यावतीने चार्टर्ड अकाउंटन्ट श्री. तुकेश पाटील यांचा सन्मान

  बेळगाव : बेळगावचे युवा सी.ए. श्री. तुकेश पाटील यांचा जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवार यांच्या वतीने सी.ए. दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला. वाणिज्य क्षेत्रात, व्यवसाय आणि उद्योग धंद्यामध्ये प्रगती साधताना सर्व सी. ए. मंडळींचे कार्य महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव होणे गरजेचे आहे, असे अध्यक्ष सचिन केळवेकर …

Read More »

विद्याभारती जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा; संत मीरा, भातकांडे, शांतीनिकेतन, स्वामी विवेकानंद उपांत्य फेरीत

  बेळगाव : गणेशपुर रोड येथील गुड शेफर्ड शाळेचे आवारातील बेळगाव टर्फ मैदानावर संत मीरा इंग्रजी माध्यम शाळा गणेशपुर हे हिंडलगा आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या विविध सामन्यात संत मीरा अनगोळ, गजाननराव भातकांडे, शांतीनिकेतन स्कूल खानापूर, स्वामी विवेकानंद स्कूल खानापूर यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव उपांत्य फेरीत प्रवेश केला. …

Read More »

सन्मित्र मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीत

  बेळगाव : येळ्ळूर ता. बेळगांव येथील सन्मित्र मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या संस्थेची तेरावी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री बाल शिवाजी वाचनालयाच्या सभागृहात नुकतीच खेळीमेळीत पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे संस्थापक वाय.सी. गोरल सर होते व प्रमुख वक्त्या म्हणून ॲड. सरिता सतीश पाटील उपस्थित होत्या. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला …

Read More »

जायंट्सची मल्टी युनिट कॉन्फरन्स रविवारी

  बेळगाव : जायंट्सच्या कर्नाटक शाखा द्वारा फेडरेशन 6 ची राज्यस्तरीय मल्टी युनिट कॉन्फरन्स येत्या रविवारी महिला विद्यालय, मराठी माध्यम शाळेच्या सभागृहात संपन्न होणार आहे. जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन आणि बेळगाव सखी यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या या परिषदेत कर्नाटकातील विविध ग्रुपचे 150 सभासद सहभागी होणार आहेत. या परिषदेचे उद्घाटन …

Read More »

इंडियन बँकेच्या लॉकरमधील चोरी प्रकरणी एक अटकेत; 14 लाखाचे दागिने जप्त

  बेळगाव : शहरातील भाग्यनगर दुसरा क्रॉस येथील इंडियन बँक शाखेच्या लॉकर मधील सोन्याच्या दागिन्यांच्या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात टिळकवाडी पोलिसांना यश आले आले असून त्यांनी एकाला अटक करून त्याच्याकडील 14 लाख रुपये किमतीचे एकूण 143.9 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव चंद्रकांत बालाजी …

Read More »

कारच्या धडकेत १० वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

  अथणी : अथणी – जमखंडी मार्गावर तनिष्का बारजवळ झालेल्या भीषण अपघातात मुलाचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या बाजूने चालत जाणाऱ्या मुलाला एका भरधाव कारने चिरडले, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. अगस्त्य कानमाडी (वय १०) रुद्देरट्टी (ता. अथणी) असे मुलाचे नाव आहे. अथणी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चालक …

Read More »

येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने रोटरीचे प्रांतपाल अशोक नाईक यांचा सत्कार

  येळ्ळूर : उत्तर कर्नाटक, दक्षिण महाराष्ट्र आणि संपूर्ण गोवा राज्याच्या रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 च्या गव्हर्नर पदी, बेळगांव येथील रोटरी क्लब ऑफ बेळगांव साऊथ चे सदस्य रोटे अशोक नाईक यांची निवड झाल्याबद्दल येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघ व श्री शिवाजी विद्यालय येळ्ळूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात नूतन …

Read More »

तज्ञ समिती अध्यक्ष धैर्यशील माने यांच्याशी रमाकांत कोंडूसकर यांनी केली सीमाप्रश्नासंदर्भात चर्चा

  बेळगाव : सीमाप्रश्न तज्ञ समितीचे अध्यक्ष म्हणून पुन्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माननीय खासदार श्री. धैर्यशील माने यांची म. एकीकरण समितीचे नेते श्री. रमाकांत दादा कोंडुसकर यांनी आज दि. 4 जुलै रोजी कोल्हापूर निवासस्थानी भेट घेतली. यावेळी कोंडूसकर यांनी माने यांचा सत्कार केला. व सीमाप्रश्नी चर्चा केली. ह्या भेटीदरम्यान येणाऱ्या …

Read More »

राकसकोप जलाशय पूर्ण क्षमतेने भरले!

  बेळगाव : सतत पडणाऱ्या संततधार पावसामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. त्याचबरोबर परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहत असून बेळगाव शहराची तहान भागवणारे राकसकोप जलाशय देखील पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे राकसकोप धरणाचे एक दार उघडण्यात आले आहे. राकसकोप धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे बेळगाव शहरावरील पाणीटंचाईचे संकट दूर झाल्याची …

Read More »

भाषिक अल्पसंख्याक आयोगासह महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी सीमाभागात सुरू असलेल्या कन्नडसक्तीची दखल घ्यावी : प्रकाश मरगाळे

  बेळगाव : कर्नाटक राज्याच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांनी एक अध्यादेश जारी केला असून शासकीय कार्यालयात फक्त कानडी भाषेचा वापर करावा असा शासकीय आदेश काढण्यात आला आहे. हा आदेश म्हणजे भाषिक अल्पसंख्यांक आयोगाच्या त्रिसूत्रीय धोरणाला वाटाण्याच्या अक्षताच म्हणाव्या लागतील. कर्नाटक राज्याच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांच्या आदेशाची बेळगाव महानगरपालिकेने …

Read More »