Monday , September 21 2026
Breaking News

बहिर्जी शिरोळकर पदवी पूर्व महाविद्यालयात हिंदी दिन साजरा

Spread the love

 

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, बहिर्जी शिरोळकर पदवी पूर्व महाविद्यालयामध्ये नुकताच हिंदी दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. एस. एस. मोहिते हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व महात्मा ज्योतिबा फुले आणि महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी वार्षिक परीक्षेमध्ये हिंदी विषयांमध्ये सर्वाधिक 100 पैकी 99 गुण मिळविलेल्या विद्यार्थिनी कु. सुनिता अ. बडवानाचे हिचा सत्कार करण्यात आला.
प्राध्यापक डॉ. परसराम बसर्गे व प्राध्यापिका श्रीमती. रितू. एस. पाटील व महाविद्यालयाचे हिंदी विषयाचे प्राध्यापक श्री. सुरेश कांबळे यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी विभागाची विद्यार्थिनी कुमारी ममता कांबळे हिने तर आभार प्रदर्शन विद्यार्थी साहिल मोरे यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *