Monday , December 15 2025
Breaking News

बेळगाव

विद्याभारती जिल्हास्तरीय सांघीक क्रीडा स्पर्धांना प्रारंभ

  बेळगाव : गणेशपुर येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळा आयोजित बेळगांव जिल्हास्तरीय विद्याभारती सांघिक क्रीडा स्पर्धांना मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. या सांघिक बुद्धिबळ, योगा, कराटे, मलखांब जिल्हास्तरीय स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख म्हणून विद्याभारती बेळगाव जिल्हाअध्यक्ष माधव पुणेकर, उपाध्यक्ष रामनाथ नाईक, सचिव एस बी कुलकर्णी, संत मीरा इंग्रजी माध्यम गणेशपुर शाळेचे …

Read More »

पालकांनी लग्नास संमती न दिल्याने प्रेमीयुगुलाची आत्महत्या!

  बेळगाव: पालकांनी लग्नाला संमती न दिल्याने दोन प्रेमीयुगुलांनी ऑटोमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गोकाकच्या बाहेरील चिक्कनंदी गावात घडली. मुनवळ्ळी येथील रहिवासी राघवेंद्र जाधव (२८) आणि रंजीता चोबारी (२६) हे मृत प्रेमीयुगुल यांच्यात प्रेम आहेत. दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत होते. पालकांच्या संमतीने रंजिताचे दुसऱ्या मुलाशी लग्न …

Read More »

बेळगावकरांच्या पसंतीस उतरलेला “ऑल इज वेल” जोमात!

  बेळगाव : बेळगावकर निर्माते अमोध मुचंडीकर, वाणी हालप्पनवर तसेच दिग्दर्शक योगेश जाधव यांनी बनविलेला वाणीश्री फिल्म प्रॉडक्शनचा धमाल विनोदी चित्रपट “ऑल इज वेल” दि. २७ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. जाती – धर्मा पलीकडच्या मैत्रीची अनोखी गोष्ट सांगणारा हा चित्रपट बेळगाव शहरातील दोन प्रसिद्ध चित्रपटगृहांमध्ये झळकला आहे. गेल्या …

Read More »

रोटरी इ क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

  बेळगाव : रोटरी इ क्लबचा वसंतराव पोतदार पॉलीटेकनिक येथील सभागृहात पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. रो. कविता कणगणी यांची 2025-26 सालासाठी रोटरी इ क्लबच्या अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर रोटरीचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. वेंकटेश देशपांडे, माजी अध्यक्षा रो. लक्ष्मी मुतालिक, माजी सचिव रो. सागर वाघमारे, नवनिर्वाचित …

Read More »

वाहतूक नियंत्रण उपनिरीक्षकांनी बुजविले रस्त्यांवरील खड्डे!

  बेळगाव : बेळगाव शहरात सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हे समजण्यापलीकडे आहे. वाहनचालकांना वाहन चालविणे कठीण झाले आहे अशा परिस्थितीत बेळगावचे वाहतूक नियंत्रण उपनिरीक्षक श्री. महांतेश मठपती यांनी शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन आदर्श निर्माण केला. त्यांच्या या कार्याचे करावे तितके …

Read More »

इंगळगी मारहाण प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करा; भाजप-श्रीराम सेनेची मागणी

  बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील इंगळगी येथे श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी करत भाजप आणि श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावात जोरदार निदर्शने केली. आज बेळगावातील एसपी कार्यालयासमोर भाजप आणि श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी हुक्केरी तालुक्यातील इंगळगी येथे श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करत निदर्शने केली. …

Read More »

बेळगावसह कर्नाटकातील चार विमानतळांना धमकीचा ईमेल!

  बेळगाव : कर्नाटकातील चार प्रमुख विमानतळांना बॉम्ब स्फोट घडवून उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल आल्याने एकच खळबळ उडाली. बेळगाव, हुबळी, मंगळुरू आणि बेंगळुरू या कर्नाटकातील विमानतळांना बॉम्ब स्फोट घडवून उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल विमानतळांच्या संचालकांना पाठवण्यात आला. त्यामुळे सर्व विमानतळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. “रोडकिल क्यो” नावाच्या ईमेल आयडीवरून सदर …

Read More »

नेगील योगी रयत सेवा संघाच्यावतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

  बेळगाव : नेगील योगी रयत सेवा संघ कर्नाटक बेळगाव शाखा यांच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या सहाय्यकानी शेतकऱ्यांच्या निवेदनाचा स्वीकार केला व सदर निवेदन लवकरात लवकर शासनाकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात …

Read More »

इंगळगी मारहाणी प्रकरणी चार जणांना अटक

  बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील इंगळी गावात श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना झालेली मारहाणीची घटना दुर्दैवी आहे. या प्रकरणी चार जणांना गजाआड करण्यात आली असल्याची माहिती बेळगावचे जिल्हा पोलिस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी दिली. पत्रकार परिषदेत माहिती देताना ते म्हणाले की, काल हुक्केरी तालुक्यातील इंगळी गावात एक दुर्दैवी घटना घडली आणि त्याचा …

Read More »

श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ ३ जुलै रोजी हुक्केरी बंदचा इशारा

  हुक्केरी : अवैध गो तस्करी करणाऱ्यांची अडवणूक करणाऱ्या श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ३ जुलै रोजी हुक्केरी बंदचा इशारा देण्यात आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांच्या नेतृत्वाखाली “चलो इंगळगी” निषेध रॅली काढण्यात येणार आहे. श्रीराम सेनेचे प्रदेशाध्यक्ष गंगाधर कुलकर्णी यांनी या संदर्भात बोलताना …

Read More »