Tuesday , November 24 2026
Breaking News

बेळगाव

लेबर कार्डाच्या आमिषाने मजुराला २.६० लाखांचा गंडा

  मोबाईल, आधार वारंवार ताब्यात घेऊन बँक खात्यातून रक्कम परस्पर वळवली बेळगाव : लेबर कार्ड बनवून देण्यासह ते अपडेट करून देण्याचे आमिष दाखवत एका मजुराचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर त्याचा मोबाईल फोन व आधार कार्ड वारंवार ताब्यात घेऊन बँक खात्यातून परस्पर तब्बल २ लाख ६० हजार ५८४ रुपये विविध …

Read More »

तंजावर साहित्य संमेलनासाठी बेळगावकरांनी सहभागी व्हावे : युवराज संभाजीराजेंचे आवाहन

  बेळगावात आयोजकांचे उत्साहात स्वागत; संमेलनात बेळगावकर सहभागी होणार बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने तामिळनाडूतील ऐतिहासिक तंजावर येथे २३ सप्टेंबर २०२६ रोजी राजे सरफोजीराजे भोसले (द्वितीय) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांचे बेळगावातील कॉलेज रोड येथील यश ॲटोच्या दालनात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. दक्षिण …

Read More »

प्रलंबित मागण्यांसाठी बेळगावात बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन; ७ ऑगस्टला संसदेला घेरावाचा इशारा

  बेळगाव : विविध प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बीएसएनएल कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी गुरुवारी बेळगावात धरणे आंदोलन केले. दीर्घकाळापासून रखडलेल्या वेतनवाढ, पेन्शन दुरुस्ती आणि बीएसएनएलची ४जी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी गेल्या नऊ वर्षांपासून वेतनवाढ प्रलंबित असल्याने कर्मचारी आर्थिक अडचणींना सामोरे …

Read More »

नीट गैरव्यवहाराच्या निषेधार्थ बेळगावात तीव्र आंदोलन; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

  बेळगाव : देशभरात गाजत असलेल्या नीट (NEET) परीक्षा प्रश्नपत्रिका गळती प्रकरणासह विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांचा निषेध करत बेळगावात गुरुवारी युथ काँग्रेस आणि विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले. राणी चन्नम्मा चौकात झालेल्या या निदर्शनांमध्ये दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. युथ काँग्रेसचे नेते अमान सेठ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या …

Read More »

व्हॅक्सिन डेपो येथे रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचे वृक्षारोपण अभियान

  बेळगाव : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे गुरुवारी व्हॅक्सिन डेपो परिसरात वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. रोटरी परिवारातील सदस्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून विविध प्रकारची रोपे लावण्यात आली. या उपक्रमाद्वारे पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा आणि लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारीही स्वीकारावी, असा संदेश देण्यात आला. सदस्यांनी परिसर …

Read More »

बेळगाव शहरालगत 70 किलोमीटर लांबीचा नवा रस्ता; मंत्री नितीन गडकरी आणि खा. जगदीश शेट्टर यांची चर्चा

बेळगाव : खासदार जगदीश शेट्टर यांनी बुधवारी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीवेळी बेळगाव शहराजवळून जाणाऱ्या महामार्गाच्या बांधकामाच्या निविदा प्रक्रियेला मंजुरी द्यावी तसेच बेळगाव-हुनगुंद-रायचूर महामार्गापासून शेतवडीत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. बेळगाव शहरालगत 70 किलोमीटर लांबीचा नवा रस्ता …

Read More »

गोकाकमध्ये कोचिंग सेंटर शिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थिनींवरील अत्याचाराचा आरोप

  संशयित शिक्षक पोलिसांच्या ताब्यात; संतप्त पालकांचे आंदोलन गोकाक : शहरातील एका खासगी कोचिंग सेंटरमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकावर दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच गोकाक शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करून संशयित शिक्षकाला ताब्यात घेतले …

Read More »

“वाचन केले तरच वाचाल” : विद्यार्थिनींना प्रा. मायाप्पा पाटील यांचा प्रेरणादायी संदेश

  जायंट्स सखीच्या वतीने व्याख्यान बेळगाव : सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी पुस्तक वाचन अत्यावश्यक असून, वाचनामुळे जीवन अधिक समृद्ध आणि सकस बनते. अनेक अशक्यप्राय गोष्टीही सातत्यपूर्ण वाचनामुळे सहज साध्य होतात. उदात्त ध्येये गाठायची असतील तर चांगल्या पुस्तकांशी मैत्री करावी लागते. उत्तम पुस्तकांचे नियमित वाचन ध्येयवेडे आणि यशस्वी व्यक्तिमत्त्व घडविण्यास मोलाची मदत …

Read More »

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी रोटरी क्लब ऑफ बेळगाव उत्तरचे हरित अभियान सुरू

  बेळगाव : आगामी गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासन आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव उत्तर यांच्या संयुक्त विद्यमाने शाडूच्या गणेशमूर्तींचा प्रचार-प्रसार करणाऱ्या विशेष अभियानाचा प्रारंभ करण्यात आला आहे. या अभियानाअंतर्गत शहरातील १० ठिकाणी शाडूच्या गणेशमूर्तींच्या बुकिंग व वितरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) …

Read More »

अवैध सावकारी प्रकरणातील फरार आरोपी संकेश्वर पोलिसांच्या जाळ्यात

  बेळगाव : अवैध सावकारी, जादा पैशांची मागणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपीला संकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. सदानंद भीमराव हलगे (वय ४७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. करजगा येथील एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिने घेतलेल्या कर्जाची मुद्दल व व्याजासह एकूण ३६.७७ लाख रुपये परतफेड …

Read More »