Sunday , September 20 2026
Breaking News

अवैध सावकारी प्रकरणातील फरार आरोपी संकेश्वर पोलिसांच्या जाळ्यात

Spread the love

 

बेळगाव : अवैध सावकारी, जादा पैशांची मागणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपीला संकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. सदानंद भीमराव हलगे (वय ४७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

करजगा येथील एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिने घेतलेल्या कर्जाची मुद्दल व व्याजासह एकूण ३६.७७ लाख रुपये परतफेड केली होती. मात्र, त्यानंतरही आरोपीने आणखी ४.६४ लाख रुपयांची मागणी करत तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. संकेश्वर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे २२ जुलै रोजी कणगला गावाजवळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संकेश्वर पोलीस करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *