Sunday , September 20 2026
Breaking News

उपमुख्यमंत्रीपदाबाबत पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य; सतीश जारकीहोळींचे स्पष्ट विधान

Spread the love

 

नवी दिल्ली : कर्नाटकात अतिरिक्त उपमुख्यमंत्रीपदाच्या चर्चेला वेग आला असतानाच सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अतिरिक्त उपमुख्यमंत्रीपदाबाबत अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांड घेणार असून, पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल, असे त्यांनी सांगितले.

नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जारकीहोळी म्हणाले, “अतिरिक्त उपमुख्यमंत्रीपदे निर्माण करायची की नाही, हा पूर्णपणे काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा अधिकार आहे. मी स्वतः कधीही उपमुख्यमंत्रीपदाची मागणी केलेली नाही. पक्षाचा जो निर्णय असेल, त्याचे पालन करणे ही माझी जबाबदारी आहे.”

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, काँग्रेसचे वरिष्ठ नेते सध्या ‘नीट’ गैरव्यवहाराविरोधातील आंदोलनात व्यस्त असल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातील बैठक होऊ शकली नाही. देशाच्या दृष्टीने हे आंदोलन महत्त्वाचे असल्याने विस्ताराचा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे.

शनिवार किंवा रविवारी पक्षश्रेष्ठींची बैठक होण्याची शक्यता असून, त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि इतर राजकीय निर्णयांबाबत अंतिम भूमिका स्पष्ट होईल, असेही जारकीहोळी यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *