Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगाव जिल्ह्यात मतदार यादी पुनरीक्षणाला वेग; १८ मतदारसंघांत अर्ज वाटप १०० टक्के पूर्ण

Spread the love

 

बेळगाव : मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेला बेळगाव जिल्ह्यात वेग आला असून, सर्व १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदारांना अर्ज वाटपाचे काम १०० टक्के पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

जिल्ह्यातील ४१.०७ लाख मतदारांपर्यंत अर्ज पोहोचविण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून, प्रत्येक मतदाराने मतदार यादीतील आपले नाव, पत्ता आणि मतदान केंद्राची माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार मतदारांची अचूक माहिती संकलित करण्यासाठी बीएलओ कर्मचारी घरोघरी जाऊन अर्ज व स्टिकर्सचे वितरण करत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ७६ टक्के माहितीचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असून, बेळगाव दक्षिण मतदारसंघात ६० टक्के तर बेळगाव उत्तर मतदारसंघात ५१ टक्के काम पूर्ण झाले आहे.

प्राप्त अर्ज ऑनलाइन नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, आवश्यक असल्यास अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी आणखी एक आठवड्याची मुदत दिली जाऊ शकते, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

घरात उपलब्ध नसलेल्या मतदारांच्या सोयीसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलओ सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी तेथे जाऊन आवश्यक अर्ज सादर करावेत. तसेच मृत, स्थलांतरित आणि दुबार मतदारांची यादी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मतदार यादीत नाव, पत्ता किंवा इतर कोणतीही त्रुटी आढळल्यास अथवा जिवंत व्यक्तीची नोंद चुकून मृत म्हणून झाल्यास ती दुरुस्त करण्यासाठी ८ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या पुनरीक्षण मोहिमेत सर्व नागरिक आणि राजकीय पक्षांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *