Sunday , September 20 2026
Breaking News

८ ऑगस्टची अंतिम मुदत जवळ; एसआयआर मोहिमेला वेग, बीएलओंची घराघरांत धावपळ

Spread the love

 

बेळगाव : मतदार यादी पुनर्निरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेची ८ ऑगस्ट ही अंतिम मुदत जवळ येत असल्याने जिल्हा प्रशासनाने कामाला अधिक गती दिली आहे. ३० जूनपासून सुरू असलेली ही मोहीम निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी बूथ लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ) युद्धपातळीवर घराघरांत जाऊन अर्ज संकलन आणि ऑनलाइन नोंदणीचे काम करत आहेत.

आतापर्यंत बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघातील १ लाख ५० हजार ३०९, तर बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील १ लाख ३१ हजार २८ अर्जांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण झाली आहे. उर्वरित अर्जांची छाननी आणि नोंदणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

मतदार यादी अचूक, पारदर्शक आणि त्रुटीमुक्त ठेवण्यासाठी एसआयआर प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पात्र मतदारांची नावे वगळली जाणार नाहीत आणि अपात्र किंवा चुकीच्या नोंदी राहणार नाहीत, यासाठी प्रत्येक अर्जाची बारकाईने पडताळणी करून माहिती डिजिटल प्रणालीमध्ये नोंदविली जात आहे.

बीएलओंकडून घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संपर्क साधला जात असून अर्जांचे वितरण, भरलेले अर्ज स्वीकारणे आणि त्यांची ऑनलाइन नोंदणी ही कामे वेगाने सुरू आहेत. अर्ज वितरणाचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित मतदारांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, अद्याप अर्ज भरून न दिलेल्या मतदारांनी विलंब न करता संबंधित बीएलओंशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नागरिकांच्या सक्रिय सहभागातूनच अचूक, विश्वासार्ह आणि त्रुटीमुक्त मतदार यादी तयार होणार असून, अंतिम मुदतीपूर्वी ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *