Sunday , September 20 2026
Breaking News

आप्पाचीवाडी येथील पुलाच्या कामाला प्रारंभ न केल्यास कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे रस्त्यावरची लढाई

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी येथील श्री हालसिध्दनाथ देवालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुलाची निर्मिती करावी, तालुका पंचायत कार्यालयातील शेतकऱ्यांची प्रलंबित कामे मार्गी लावावीत यासह विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ही कामे त्वरित करण्याचे आश्वासन पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने जिल्हा पाटबंधारे खात्याचे अधिकाऱ्यांची भेट घेऊन तात्काळ कामाला प्रारंभ करावा या मागणीसाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार आणि तालुक्यातील शाखांचा पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. आप्पाचीवाडी पुलाच्या कामास तात्काळ प्रारंभ न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी दिला आहे.
राजू पोवार म्हणाले, शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या समस्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. आप्पाचीवाडी येथील पुलाच्या निर्मितीबाबत तहसीलदार सुरेश मुंजे, प्रांताधिकारी सुभाष संपगावी आणि इतर अधिकाऱ्यांनी महिनाभरात पुलाच्या कामाला सुरुवात करण्याच्या आश्वासन दिले होते. पण महिना उलटूनही काम न सुरू केल्याने जिल्हा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घ्यावी लागली. तात्काळ काम सुरू न केल्यास रस्त्यावरची लढाई लढावी लागेल असा इशारा पोवार दिला आहे. यावेळी सत्याप्पा मल्लापुरे, मंजू पुजारी, प्रकाश नाईक, गोपाळ लोकुर, सर्जेराव हेगडे, बबन जामदार, मयूर पोवार यांच्यासह कर्नाटक राज्य रयत संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *