Sunday , July 26 2026
Breaking News

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी रोटरी क्लब ऑफ बेळगाव उत्तरचे हरित अभियान सुरू

Spread the love

 

बेळगाव : आगामी गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासन आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव उत्तर यांच्या संयुक्त विद्यमाने शाडूच्या गणेशमूर्तींचा प्रचार-प्रसार करणाऱ्या विशेष अभियानाचा प्रारंभ करण्यात आला आहे.

या अभियानाअंतर्गत शहरातील १० ठिकाणी शाडूच्या गणेशमूर्तींच्या बुकिंग व वितरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) आणि रासायनिक रंगांच्या मूर्ती टाळून पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तींचीच प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले.

रोटरी क्लब ऑफ बेळगाव उत्तरच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन अभियानाची माहिती दिली. या उपक्रमाला जिल्हा प्रशासनाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

रोटरी क्लबतर्फे गेल्या सात वर्षांपासून हा पर्यावरण जनजागृतीचा उपक्रम राबविला जात आहे. पीओपीच्या मूर्तींमुळे जलस्रोतांचे प्रदूषण होते तसेच विसर्जनावेळी मूर्तींची विटंबना होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे शाडूच्या मूर्तींचा वापर करण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती क्लबचे पदाधिकारी सुधीर यांनी दिली. माजी अध्यक्ष इरफान शेख यांनीही पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

शहरातील बामणे टॉवर्स (गोवा वेस), कुमारस्वामी लेआउट, भाग्यनगर, किर्लोस्कर रोड, वडगाव, खासबाग सर्कल, शिवबसवनगर, टिळकवाडी, हिंडलगा आणि मंडोळी रोड या १० केंद्रांवर शाडूच्या गणेशमूर्तींचे बुकिंग व वितरण करण्यात येणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *