Sunday , September 20 2026
Breaking News

लेबर कार्डाच्या आमिषाने मजुराला २.६० लाखांचा गंडा

Spread the love

 

मोबाईल, आधार वारंवार ताब्यात घेऊन बँक खात्यातून रक्कम परस्पर वळवली

बेळगाव : लेबर कार्ड बनवून देण्यासह ते अपडेट करून देण्याचे आमिष दाखवत एका मजुराचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर त्याचा मोबाईल फोन व आधार कार्ड वारंवार ताब्यात घेऊन बँक खात्यातून परस्पर तब्बल २ लाख ६० हजार ५८४ रुपये विविध खात्यांमध्ये वळवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी बेकिनकेरे येथील निंगाप्पा इराप्पा सावंत यांनी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांसोबत सुमारे दहा वर्षांपासून काम करणाऱ्या एका परिचिताने मार्च २०२६ मध्ये लेबर कार्ड काढून देण्याचे आश्वासन दिले. या प्रक्रियेसाठी त्याने सावंत यांचा मोबाईल फोन आणि आधार कार्ड ताब्यात घेतले व सायंकाळी परत केले.

यानंतर लेबर कार्ड अपडेट करण्याचे कारण सांगत त्याने सावंत यांच्याकडून मोबाईल आणि आधार कार्ड तब्बल २५ ते ३० वेळा घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने तक्रारदाराच्या बँक खात्यातील रक्कम परस्पर विविध खात्यांमध्ये वर्ग केल्याचा आरोप आहे.

१३ मार्च ते २५ जून २०२६ या कालावधीत वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे २ लाख ६० हजार ५८४ रुपये विविध बँक खात्यांमध्ये वळवून आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला असून बँक व्यवहारांचा तपशील आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *