Monday , September 21 2026
Breaking News

व्हॅक्सिन डेपो येथे रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचे वृक्षारोपण अभियान

Spread the love

 

बेळगाव : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे गुरुवारी व्हॅक्सिन डेपो परिसरात वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. रोटरी परिवारातील सदस्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून विविध प्रकारची रोपे लावण्यात आली.

या उपक्रमाद्वारे पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा आणि लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारीही स्वीकारावी, असा संदेश देण्यात आला. सदस्यांनी परिसर अधिक हिरवागार आणि स्वच्छ ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

उपक्रमाच्या आयोजनासाठी श्री. अभय पाटील यांच्या सहकार्याबद्दल क्लबतर्फे आभार मानण्यात आले. तसेच रोटेरियन अनुपमा कल्लोळ, रेणुका मोत्रे, सविता वेसणे, स्मिता पाटील आणि सुजाता हुनकुंते यांच्या सक्रिय सहभागाचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन आणि समन्वय इव्हेंट चेअर रोटेरियन रक्षिता उपाध्ये यांनी केले.

यावेळी क्लबच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तीहोळी यांनी, “आज लावलेले प्रत्येक रोपटे हे भविष्यातील निरोगी आणि हरित पर्यावरणासाठीची गुंतवणूक आहे. पर्यावरण संरक्षणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येण्याची गरज आहे,” असे सांगितले.

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे भविष्यातही पर्यावरण संवर्धन आणि समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *