Sunday , September 20 2026
Breaking News

महात्मा बसवेश्वर सौहार्द संस्थेतर्फे जिल्हा बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांचा सत्कार

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील चिक्कोडी रोडवरील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेतर्फे बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांची नॅशनल को-ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया नवी दिल्लीच्या संचालक मंडळावर निवड झाल्याबद्दल महात्मा बसवेश्वर क्रेडिट संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.

प्रारंभी संस्थेचे संस्थापक सहकाररत्न डॉ. सी. बी. कुरबेट्टी व संस्थेचे अध्यक्ष किशोर बाली यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर, सिद्धेश्वर स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून व
माजी खासदार अण्णासाहेब ज्वोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांचा सत्कार डॉ. सी. बी. कुरबेट्टी व संचालक प्रताप पट्टनशेट्टी, संचालक सुरेश शेट्टी यांच्या हस्ते सत्कार झाला. डॉ. कुरबेट्टी म्हणाले, अण्णासाहेब जोल्ले यांना नॅशनल को-ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया या नवी दिल्लीच्या संचालक मंडळावर नियुक्ती केल्याबद्दल या मंडळाला एक सहकाराचा अभ्यासक व सहकार चळवळीची तळमळ असणारे, सहकार चळवळीला बळकटी व प्रोत्साहन देणार नेतृत्व या मंडळाला मिळाले आहे. त्यामुळे सहकार चळवळीला चालना मिळणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास संचालक डॉ. एस. आर. पाटील, श्रीकांत परमने, महेश बागेवाडी, अशोक लिगाडे, दिनेश पाटील, राजेश पाटील, संचालिका पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी, सीईओ एस. के. अदनावर, असिस्टंट सीईओ महेश शेट्टी, भद्रेश फुटाणे, विद्या कमते, महादेव बडीगेर, सुजाता जाधव, चंद्रकांत हणबर, सुरज घोडके यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. राजेंद्र मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप गायकवाड यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *