

निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील महांतेश नगरमधील महंत भवनात रत्नाबाई व कल्याणप्पा उदगट्टी सोशल फाउंडेशन, सरोजनी व आणि महालिंगप्पा नांदगाव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सन्मान सोहळा पार पडला यावेळी,सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, शेती, उद्योग-व्यवसाय, कला, क्रीडा व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ८५ मान्यवरांचागौरव करण्यात आला. त्यामध्ये येथील पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले आणि अपूर्वा चौगुले यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या वृक्षारोपणाच्या प्रतीकात्मक उपक्रमाने करण्यात आली. बाळासाहेब उदगट्टी यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. महिला जिल्हाध्यक्षा लता माने यांनी महिलांच्या सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन केले. सोहळ्यात पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड, पर्यावरण जनजागृती आणि विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम रुजविण्यासाठी सातत्याने कार्य करणारे अपूर्वा चौगुले व नामदेव चौगुले यांना “पर्यावरणप्रेमी आदर्श शिक्षक दाम्पत्य” पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी भूमी वात्सल्य फाउंडेशनतर्फे मान्यवरांना गुलाबरोपे भेट देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. याशिवाय सामाजिक कार्याला हातभार म्हणून अम्मा फाउंडेशनला ५ हजार रुपयांची देणगी देण्यात आली.
कार्यक्रमास राजेंद्र लवटे, जयश्री लवटे, शिव नांदगावे, महमद पिरजादे, शंकर गुडस, सुरेश कडेकोप, कार्जी सर, सुनील मुडलिहाळ, वैशाली सुतार, मंजुळा कापशे, विजयालक्ष्मी तळवार, सरोजिनी शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta