Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव शहरालगत 70 किलोमीटर लांबीचा नवा रस्ता; मंत्री नितीन गडकरी आणि खा. जगदीश शेट्टर यांची चर्चा

Spread the love

बेळगाव : खासदार जगदीश शेट्टर यांनी बुधवारी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीवेळी बेळगाव शहराजवळून जाणाऱ्या महामार्गाच्या बांधकामाच्या निविदा प्रक्रियेला मंजुरी द्यावी तसेच बेळगाव-हुनगुंद-रायचूर महामार्गापासून शेतवडीत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

बेळगाव शहरालगत 70 किलोमीटर लांबीचा नवा रस्ता केला जाणार आहे. येथील पहिल्या टप्प्यात 35 किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी 80 टक्के भूसंपादन आणि 88 टक्के नुकसानभरपाई वाटपाचे काम आधीच पूर्ण झाले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील भूसंपादन आणि नुकसानभरपाई वाटपाचे काम पूर्ण झाल्यानंतरच बांधकामाचे निर्देश दिले आहेत. यातील त्रुटी दूर करण्यासाठी पहिल्या टप्प्यातील 35 कि. मी. रस्त्याच्या बांधकामासाठी निविदा मागविण्याचा प्रस्ताव दिला. यामुळे बेळगाव शहरातील वाहतूक कोंडी टाळता येणार आहे.

बेळगाव-हुनगुंद-रायचूर या सहा पदरी रस्त्याच्या बांधकामात बेळगाव, बैलहोंगल आणि रामदुर्ग तालुक्यातील काही गावांना त्यांच्या शेतवडीपर्यंतचा जोडणारा रस्ता उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक ठिकाणी जोड रस्ता करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *