Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणीत गुरुवारी धर्मवीर संभाजीराजे चौकात मानवी साखळी

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : दिल्ली येथील पोलीसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करून आश्रुधुर सोडून मारहाण केली आहे. त्याच्या निषेधार्थ विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या शांततापूर्ण केलेल्या आंदोलनाला हुकूमशाही सरकार घाबरली आहे. पोलीस बळाचा गैरवापर करून विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना अटक केली. हे या सरकारच्या अपयशाचे लक्षण आहे. राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ निपाणी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस कमीटी तर्फे गुरुवारी (ता.२३) रोजी सकाळी १० वाजता येथील धर्मवीर संभाजीराजे चौकात मानवी साखळी करून आंदोलन करण्यात येणार आहे. तरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी. विद्यार्थी व नागरिकांनी उपस्थित रहावून निषेध नोंदविण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *