Sunday , July 26 2026
Breaking News

परवानगीशिवाय खासगी कार्यक्रमांना हजेरी महागात; सरकारी महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना शिक्षण विभागाचा इशारा

Spread the love

 

बेळगाव : सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयांतील अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयीन कामकाजाच्या वेळेत संचालकांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय खासगी संस्था, संघटना किंवा अन्य अशासकीय संस्थांच्या सभा, कार्यशाळा, समारंभ आणि विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ नये, असे स्पष्ट निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कर्नाटक नागरी सेवा नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही विभागाने दिला आहे.

शिक्षण विभागाने १८ जुलै रोजी जारी केलेल्या परिपत्रकात सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी शिस्त, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, सार्वजनिक हित आणि प्रशासकीय जबाबदारी जपत काम करणे बंधनकारक असल्याचे अधोरेखित केले आहे. सरकारी सेवेच्या कर्तव्यात बाधा येईल किंवा पूर्वपरवानगी आवश्यक असलेल्या उपक्रमांमध्ये नियमबाह्य सहभाग घेणे टाळण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

यापुढे अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची आवश्यकता असल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी योग्य कारण नमूद करून संचालकांची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य राहणार आहे. तसेच या कारणामुळे महाविद्यालयातील शैक्षणिक कामकाजात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची जबाबदारी शिक्षणाधिकारी आणि प्राचार्यांवर सोपविण्यात आली आहे.

परिपत्रकातील निर्देशांचे उल्लंघन करणारे अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांविरुद्ध कर्नाटक नागरी सेवा नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. राज्यातील सर्व जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही शिक्षण विभागाने दिले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटकातील ४४.८४ लाख मतदार वगळले जाण्याची शक्यता

Spread the love  व्ही. अनबू कुमार; पत्ता बदल, मृत्यू व डुप्लिकेट नोंदींची पडताळणी बंगळूर : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *