Sunday , July 26 2026
Breaking News

गोकाकमध्ये कोचिंग सेंटर शिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थिनींवरील अत्याचाराचा आरोप

Spread the love

 

संशयित शिक्षक पोलिसांच्या ताब्यात; संतप्त पालकांचे आंदोलन

गोकाक : शहरातील एका खासगी कोचिंग सेंटरमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकावर दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच गोकाक शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करून संशयित शिक्षकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

घटना समोर आल्यानंतर पीडित विद्यार्थिनींचे पालक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने संबंधित कोचिंग सेंटरसमोर जमले. संशयित शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत संतप्त पालक व नागरिकांनी आंदोलन केले. त्यामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.

दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पीडित विद्यार्थिनीच्या आईने भावनिक होत आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्याची विनंती केली. या घटनेमुळे उपस्थित नागरिकांमध्येही हळहळ व्यक्त करण्यात आली.

या प्रकरणी गोकाक शहर पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित शिक्षक पोलिसांच्या ताब्यात आहे. घटनेशी संबंधित सर्व बाबींची चौकशी केली जात असून, तपासातून समोर येणाऱ्या तथ्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, पीडित अल्पवयीन विद्यार्थिनींची ओळख सार्वजनिक होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन पोलिस व प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रकरण संवेदनशील असल्याने पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेचे नेमके सत्य स्पष्ट होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *