बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवार यांच्यातर्फे युद्ध स्मारक गार्डन, हिंदवाडी, बेळगाव येथे एक विशेष वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. केवळ २ तासांमध्ये ३५ हून अधिक रोपे लावण्यात आली. खड्डे खोदणे आणि झाडे लावण्याचे सर्व काम सदस्यांनी स्वतः उत्साहाने पार पाडले. सार्वजनिक जनजागृतीसाठी बॅनर्सच्या माध्यमातून संदेश …
Read More »चेंगराचेंगरीच्या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवरील चिखलफेक थांबवावी : प्रमोद मुतालिक
बेळगाव : बेंगळुरू येथील आर.सी.बी. विजयाच्या जल्लोषात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवरील चिखलफेक थांबवावी. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी माफी मागितल्यास तो मोठा गुन्हा ठरणार नाही, असे मत श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी व्यक्त केले. आज बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना मुतालिक म्हणाले की, आर.सी.बी.च्या विजयाच्या जल्लोषात घडलेली ही दुर्घटना …
Read More »अवैध गोमांस वाहतूक आणि गोहत्येला आळा घालण्याची मागणी हिंदु संघटनांची मागणी
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात अवैध गोमांस वाहतूक आणि गोहत्या थांबवण्यासाठी कठोर आदेश जारी करण्याची मागणी करत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. निवेदनात म्हटले आहे की, बेळगाव जिल्ह्यात अवैध गोमांस वाहतूक आणि गोहत्या …
Read More »माजी सैनिक संघटना आणि रेडक्रॉस सोसायटीच्यावतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा
बेळगाव : बेळगाव जिल्हा माजी सैनिक संघटना फेडरेशन आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून न्यायालय परिसरात पर्यावरण जागृती आणि मोफत रोपे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचाच एक भाग म्हणून न्यायालयाच्या आवारात वृक्षारोपण करून मोफत रोपे वाटण्यात आली. यावेळी वनसंवर्धन करून देश …
Read More »मराठा लाईट इन्फंट्रीत ६५९ अग्निवीर जवानांच्या पाचव्या तुकडीचा दीक्षांत सोहळा दिमाखात
बेळगाव : बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेंतर्गत पाचव्या अग्निवीर तुकडीच्या प्रशिक्षणानंतर गेल्या ३१ आठवड्यांपासून लष्करी प्रशिक्षण घेतलेल्या ६५९ अग्निवीर जवानांचा दीक्षांत संचलन सोहळा आज गुरुवारी पार पडला. यावेळी जवानांनी शानदार संचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. तत्पूर्वी एमएलआयआरसी कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी संचलनाची पाहणी …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सहाय्यक शिक्षिका शामला चलवेटकर उपस्थित होत्या. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी जगभर ५ जून रोजी साजरा केला जातो आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरूकता आणि कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे …
Read More »मिरज माहेर मंडळात पर्यावरण दिन साजरा…
बेळगाव : मिरज माहेर मंडळात जुनच्या मासिक बैठकीत शोभा लोकूर यांच्या सोमवार पेठ निवासस्थानी नुकताच पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. पाहुण्या म्हणून पर्यावरण व बाग प्रेमी दीपा देशपांडे यांना निमंत्रित करण्यात आले होते. मंडळात त्यांचे अध्यक्ष अस्मिता आळतेकर व सेक्रेटरी दीपा बापट यांच्या हस्ते रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. …
Read More »कर्नाटक दैवज्ञ इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा
बेळगाव : कर्नाटक दैवज्ञ इंग्लिश मीडियम हायस्कूलने आज जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. नगरसेवक श्री. गिरीश धोंगडी, व्यवस्थापन सदस्य श्री. प्रवीण रेवणकर आणि श्री. सौरभ रेवणकर, शाळेचे प्राचार्य श्री. स्वप्नील वाके, प्रशासक श्रीमती आशा शिंदे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम शोभायमान झाला. श्री. गिरीश धोंगडी …
Read More »बालवीर विद्यानिकेतनमध्ये पर्यावरण दिन साजरा
बेळगाव : बालवीर विद्यानिकेतनमध्ये प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेखा शहापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण दिन संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून तेजल पाटील, एस. एन. जाधव, गोविंद गावडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने झाली. परिसर हा आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग असून त्याचे संरक्षण …
Read More »बेळगावात बकरी ईद निमित्ताने शांतता समितीची बैठक संपन्न
बेळगाव : मुस्लीम बांधवांचा बकरी ईद सण शांततेत आणि उत्साहात पार पडावा, यासाठी सर्वधर्मियांनी सहकार्य करावे. एखादी संशयास्पद घटना घडत असल्याचे लक्षात येताच त्याची माहिती पोलिसांना द्यावी, कोणीही नैतिक पोलीसगिरी करण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्ला पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी शांतता समिती बैठकीत दिला. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta