बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील मुसगुप्पी गावात पत्नीशी वाद झाल्याने भांडण करून घराबाहेर पडलेल्या पतीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. महालिंग सीमेगोळ (वय ३२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, महालिंग हा बुधवारी गुजनाट्टी गावातून आपल्या पत्नीसोबत भांडून घरातून बाहेर पडला होता. …
Read More »विविध मागण्यांसाठी ८ जून रोजी ऐनापूरमध्ये विशाल जैन समावेश होणार : माजी आमदार संजय पाटील
बेळगाव : जैन विकास निगम स्थापनेसह विविध मागण्यांसाठी ८ जून रोजी ऐनापूर शहरात एक विशाल जैन अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे, असे माजी आमदार संजय पाटील यांनी येथे सांगितले. आज बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आचार्य श्री गुणधर नंदी मुनी यांच्या नेतृत्वाखाली दोन समावेश आधीच झाल्या आहेत आणि …
Read More »बानुताई रामचंद्र जोशी यांचे मरणोत्तर देहदान; जायंट्स आय फौंडेशनचा पुढाकार
बेळगाव : मूळच्या केळकर बाग येथील व सध्या आदर्शनगर येथील रहिवासी बानुताई रामचंद्र जोशी यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी वार्धक्याने दुःखद निधन झाले. निधनाची बातमी समजताच त्यांचे भाचे उमेश जोशी यांना जायंट्स आय फौंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष मदन बामणे यांनी देहदानाबद्दल माहिती दिली त्यानुसार त्यांनी होकार देताच जवाहरलाल नेहरू …
Read More »कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेकडून बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना बरखास्त
बेळगाव : कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना बेंगलोर यांनी, आज बुधवारी बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आणि स्पर्धेवर बहिष्कार घातलेल्या २० क्लबच्या सदस्यांची बैठक बोलावली होती. कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेच्या सभागृहात झालेल्या तातडीच्या बैठकीत अध्यक्षांनी मानद अध्यक्ष आ. हरीश एन. ए. उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभीच अध्यक्ष हरीश एन. ए. बेळगाव आलेल्या …
Read More »आरसीबीचा विजयोत्सव साजरा करताना चाहत्याचा हृदयविकाराने मृत्यू
बेळगाव : आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकल्याच्या आनंदात सुरू असलेल्या जल्लोषादरम्यान एका चाहत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बेळगाव जिल्ह्यातील मूडलगी तालुक्यातील अवरदी गावात घडली आहे. मूडलगी तालुक्यातील अवरदी गावातील मंजुनाथ कुंभार असे मृत तरुणाचे नाव आहे. आरसीबीच्या विजयाच्या जल्लोषावेळी त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. …
Read More »केएसआरटीसी बस-ट्रक धडकेत महिलेचा मृत्यू
गोकाक : गोकाक तालुक्यातील बेनचिनमरडी गावाजवळ केएसआरटीसी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून १५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. गोकाक तालुक्यातील बेनचिनमरडी गावाजवळ केएसआरटीसी बस आणि ट्रकची धडक होऊन भीषण अपघात झाला. ट्रकच्या धडकेमुळे बस पलटी झाली. पलटी झालेल्या बसखाली अडकून येल्लव्वा …
Read More »आशा पत्रावळी “नारीशक्ती -२०२५” पुरस्काराने सन्मानित
बेळगाव : राजेश चौगुले फाउंडेशन, अंकलखोप या सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे बेळगावच्या आशा पत्रावळी यांना नारीशक्ती – २०२५ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्त्रीच्या जिद्द, संघर्ष, प्रेम, त्याग व निस्वार्थ सेवेचा, तेजस्वी वाटचालीचा गौरव करणारा हा सोहळा, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी अंकलखोप येथे आयोजित करण्यात आला …
Read More »वैश्यवाणी समाजातील गुणवंतांचा गौरव
बेळगाव : नार्वेकर वैश्य समाज शिक्षण फंड संस्थेतर्फे वैश्यवाणी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव तसेच शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम समादेवी मंगल कार्यालय येथे नुकताच पार पडला. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष रोहन जुवळी, सचिव विक्रांत कुदळे, विश्वस्त मोतीचंद दोरकाडी, महिला मंडळ अध्यक्षा अंजली किनारी, समादेवी संस्थानचे उपाध्यक्ष सुयश पानारी, सचिव अमित कुडतूरकर, …
Read More »चन्नम्मा सर्कलजवळ आरसीबी चाहत्यांना पांगवण्यासाठी किरकोळ लाठीचार्ज
बेळगाव : आरसीबी संघाने आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी चन्नम्मा सर्कल जवळ जमलेल्या हजारो आरसीबी चाहते जमले होते त्यांना पांगवण्यासाठी किरकोळ लाठीचार्ज करण्यात आला. चन्नम्मा सर्कलजवळ लावलेल्या मोठ्या स्क्रीनवर सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. आरसीबी जिंकताच, लोकांचा जल्लोष आणि नाच मर्यादेपलीकडे गेला. हे बराच वेळ चालू राहिल्याने …
Read More »जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या बढतीची शक्यता
बेळगाव : कर्नाटक राज्य पोलिस विभागाने केंद्र सरकारकडे एकाच वेळी २० उपमहानिरीक्षक (डीआयजी) पदे व एक डीजीपी पद नव्याने निर्माण करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यामुळे सेवेंत वरिष्ठतेनुसार अनेक एसपी अधिकाऱ्यांना एकाचवेळी बढती मिळण्याची शक्यता आहे. या प्रस्तावात जिल्हा पोलिसप्रमुख भीमाशंकर गुळेद यांचे नाव आहे. तसेच यापूर्वी बेळगावला पोलिसप्रमुख …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta