Saturday , March 7 2026
Breaking News

बेळगाव

शिवाजी विद्यापीठाची दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रांतर्गत प्रवेश प्रक्रिया; म. ए. समितीला विनंती

  बेळगाव : कोल्हापूर (महाराष्ट्र) येथील शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रातील विविध अभ्यासक्रमांची माहिती देण्यासाठी बेळगाव येथे प्रवेश प्रक्रिया उद्भवधन शिबिराचे आयोजन करण्याची विनंती शिवाजी विद्यापीठातर्फे महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावला करण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रांतर्गत दूरशिक्षण माध्यमात बी.ए., बी.कॉम., एम.ए. (मराठी, हिंदी, इंग्रजी, …

Read More »

कन्नडसक्ती विरोधी मोर्चाची कन्नड रक्षण वेदिकेने घेतली धास्ती; म्हणे मराठी भाषिकांनी महाराष्ट्रात जावे…

  बेळगाव : ऐन गणेशोत्सव काळात कन्नड रक्षण वेदिकेच्या मूठभर कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठी विरोधी भूमिका मांडत भाषिक तेढ निर्माण करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लावलेले गणेशोत्सव मंडळाचे स्वागत व शुभेच्छा फलक हटवण्यावरून कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मराठी द्वेष्टेपणा दाखवत शांतता भंग करण्यास सुरुवात …

Read More »

बेळगाव महानगरपालिका स्थायी समिती सदस्यांची निवड बिनविरोध

  बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या चार स्थायी समित्यांवर सदस्यांची बिनविरोध निवड झाली, जी तीनदा पुढे ढकलण्यात आली होती. प्रत्येक समितीवर एकूण सात सदस्य निवडण्यात ज्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे पाच आणि विरोधी पक्षाचे दोन सदस्य. निवडीच्या सुरुवातीला विरोधी पक्षाने स्वतःसाठी किमान तीन जागांचा आग्रह धरला होता, परंतु सत्ताधारी पक्षाने त्यावर सहमती दर्शवली …

Read More »

येळ्ळूर ग्रामपंचायतीमध्ये ग्रंथपाल दिन साजरा

  येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामपंचायतीमध्ये मंगळवार (ता. 12) रोजी ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीचे सेक्रेटरी एस. आर. मराठे होते. तर पाहुणे म्हणून प्रा. सी एम गोरल, निवृत शिक्षक एस एम मासेकर, व एस एम कोकणे उपस्थित होते. प्रारंभी ग्रंथपाल कलमेश कोकणे यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करून …

Read More »

जिल्हा प्रशासनाचा मराठी द्वेष्टेपणा उघड!

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मोर्चाला परवानगी मागितली असता पोलिस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था तसेच सणासुदीचे कारण देत परवानगी नाकारली तर दुसरीकडे मात्र अवघ्या 24 तासात कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव शहरातील चन्नम्मा चौकातून निदर्शने करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत आंदोलन केले. आश्चर्याची बाब म्हणजे पोलिस प्रशासनाने या …

Read More »

मुतगा कृषी पत्तीन सोसायटीच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांची भेट; लवकरच शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा!

  बेळगाव : मुतगा येथील प्राथमिक कृषी पत्तीन सोसायटीत मागील तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना बिनव्याजी पीक कर्ज देत नसल्याच्या निषेधार्थ तसेच सोसायटीतील गैरव्यवहाराबद्दल श्रीराम सेना हिंदुस्थानचे प्रमुख सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. मागील काही महिन्यांपूर्वी देखील याच मुद्द्यावरून सचिन पाटील यांनी उपोषण केले होते मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींच्या …

Read More »

आर्मी पब्लिक स्कूलची द. विभागीय ज्युडो स्पर्धेत चमकदार कामगिरी

  बेळगाव : आर्मी पब्लिक स्कूल, एमएलआयआरसी बेळगावच्या ज्युडो खेळाडूंनी शिर्डी, महाराष्ट्र येथे नुकत्याच पार पडलेल्या सीबीएसई दुसऱ्या दक्षिण विभागीय ज्युडो चॅम्पियनशिप -2025 स्पर्धेमध्ये 12 पदके जिंकत चमकदार कामगिरी नोंदवली असून या शाळेच्या सहा खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शिर्डी, महाराष्ट्र येथे गेल्या दि. 4 ते दि. 6 ऑगस्ट …

Read More »

बेळगावमध्ये नादसुधा सुगम संगीत शाळेचा स्थापना दिन साजरा

  नादसुधा बेळगावमध्ये संगीताचा प्रसार करत आहे आणि मुलांमध्ये संगीताची गोडी निर्माण करत आहे – एल.एस. शास्त्री बेळगाव: येथील नादसुधा सुगम संगीत शाळेचा १६ वा स्थापना दिन सोहळा रविवारी शहरातील टिळकवाडी येथील पिंक व्हरांडा जवळील नादसुधा संगीत शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला. कवी, कलाकार, पत्रकार एल.एस. शास्त्री म्हणाले, नादसुधा सुगम …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये ग्रंथपाल दिन साजरा

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. 12 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो. यादिवशी भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती. डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुण्या शाळेच्या ग्रंथपाल हर्षदा सुंठणकर यांनी पुष्पहार अर्पण केला. ग्रंथालयाचे महत्व …

Read More »

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीची बैठक उत्साहात संपन्न

  विविध स्पर्धां व परीक्षांच्या आयोजनाबाबत चर्चा बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीची बैठक उत्साहात संपन्न झाली. बैठकीच्या सुरूवातीला उपस्थितांचे स्वागत इंद्रजित मोरे यांनी केले. या बैठकीमध्ये पुढील दोन महिन्यांमध्ये सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली. यावर्षी गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी रौप्य महोत्सवी वर्ष …

Read More »