Tuesday , December 16 2025
Breaking News

बेळगाव

कॉलेज रोडवर पार्क केलेल्या ३ कार आणि १ दुचाकींना इनोव्हा कारची धडक

  बेळगाव : लिंगराज अरस कॉलेज रोड हॉस्पिटलसमोर काल मध्यरात्री दीडच्या सुमारास गोवा पासिंग एका कारने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या तीन कार आणि एका दुचाकीला जोरदार धडक दिली, यात सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. गोवा पासिंगची इनोव्हा कार भरधाव वेगाने …

Read More »

आर.पी.डी. चौक दुसरा क्रॉस येथे पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पाणी रस्त्यावर!

    बेळगाव : खानापूर रोड, आर.पी.डी. चौक दुसरा क्रॉस येथे मागील काही वर्षापासून पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पाणी रस्त्यावर तुंबत आहे. रस्त्याला दोन्ही बाजूला गटार नसल्याने भाग्यनगर वरून आलेले सर्व पाणी याठिकाणी तुंबते, थोडा जरी पाऊस झाला तरी ही समस्या निर्माण होते. याची वेळोवेळी तक्रार केल्यानंतर मागील महिन्यापूर्वी …

Read More »

घराची भिंत कोसळून तीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू

  बेळगाव : गोकाक शहरातील महालिंगेश्वर कॉलनीत आज सकाळी मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून एका तीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. मृत मुलीचे नाव कीर्ती नागेश पुजारी (वय ३) असे आहे. या घटनेत चार वर्षाची मुलगी जखमी झाली. मोठी बहीण खोलीत झोपली असताना भिंत कोसळली. त्यामुळे एका मुलीचा जागीच मृत्यू झाला. …

Read More »

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक मंगळवारी

  बेळगाव : 1 जून 1986 साली झालेल्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्माना अभिवादन करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक मंगळवार दिनांक 27 रोजी दुपारी ठीक 2 वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे आयोजित करण्यात आली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही 1 जून रोजी हिंडलगा येथील हुतात्म्यांना अभिवादन …

Read More »

१ जून रोजी हुतात्म्यांना गांभीर्याने अभिवादन!

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत १ जून १९८६ रोजी कन्नड सक्तीविरोधी आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व मराठी भाषिकांनी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाकडे जमावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या बैठकीत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर …

Read More »

बळ्ळारी नाला परिसरातील शेतकरी लागले खरिप पेरणीला

  बेळगाव : दरवर्षी पुराचा फटका त्यात कोणत्याही सरकारने विकासाचे फक्त दिलेले आश्वासन म्हणजे येथील शेतकऱ्यांना गाजराची पुंगीच वाजवत बसायच झालय. येथील शेतकरी अल्पभूधारक त्यात मुख्य व्यवसाय शेती. त्यात हंगामाआधीच अवकाळी पाऊस सुरु झाल्याने अर्धवट मशागत करुन पेरणी केल्यास पूर येण्याआधी भाताची उगवण सहा इंच ते एक फुटापर्यंत झाल्यास पूर …

Read More »

आनंदनगरमधील अपूर्ण नाला कामाचा रहिवाशांना फटका

  नाल्यात पाणी व घाण साचल्याने परिसरात दुर्गंधी : महानगरपालिकेचे दुर्लक्ष वडगाव : आनंदनगर दुसरा क्रॉस येथील नाल्याच्या अपूर्ण कामाचा येथील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. नाल्याचे काम अपूर्ण राहिल्यामुळे नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा व पाणी तुंबून राहत आहे, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नाल्यात पाणी तुंबून राहिल्यामुळे परिसरातील …

Read More »

सुवर्णपदक विजेते विनोद मैत्री व आंतरराष्ट्रीय पंच राजेश लोहार यांचा सत्कार

  बेळगाव : सुवर्णपदक विजेते विनोद मैत्री व आंतरराष्ट्रीय पंच म्हणून निवड झालेले राजेश गणपती लोहार यांचा शुक्रवारी चेंबर ऑफ कॉमर्सच्या सहभागृहात एसीपी बी. आर. कदम यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. थायलंड पटाया येथे दि 10 मे ते 13 मे 2025 दरम्यान गॅलेक्सी आयोजित जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये 60 किलो वजनी …

Read More »

अॕस्ट्रोटर्फ मैदान बेळगावात पूर्णत्वास नेऊ : खासदार जगदीश शेट्टर यांचे आश्वासन

  मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिराचा समारोप बेळगाव : बेळगाव हे हॉकीचे एक प्रमुख केंद्र असून येथून देशाला तीन ऑलिंपिकपटू दिले आहेत यामुळेच बेळगाव शहराला अॕस्ट्रोटर्फ मैदानाची नितांत गरज आहे व मी ती खेळ मंत्रालयाकडून पूर्णत्वास नेईन असे भरीव आश्वासन खासदार व माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी दिले. हॉकी बेळगाव आयोजित …

Read More »

मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना आवाहन

  बेळगाव : मराठा समाजातील यंदाच्या दहावी व बारावी परीक्षेत 90 टक्के गुण मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे लवकरच एका खास समारंभात या विद्यार्थांचा सन्मान करण्यात येणार आहे. तरी बेळगाव शहर, बेळगाव तालुका व खानापूर तालुक्यातील पात्र विद्यार्थ्यानी गुणपत्रिकेच्या झेरॉक्स व आयडेंटिटी आकाराचा फोटो, संपूर्ण …

Read More »