Monday , September 21 2026
Breaking News

संत मीरा, गोमटेश, चिटणीस, केएलएस उपांत्य फेरीत

Spread the love

 

बेळगाव : टिळकवाडी येथील सुभाष चंद्रबोस लेले मैदानावर गोमटेश विद्यापीठ स्कूल आयोजित सार्वजनिक शिक्षण खात्याच्या टिळकवाडी माध्यमिक विभागीय मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत संत मीरा, गोमटेश, केएलएस, जी जी चिटणीस शाळेने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
17 वर्षाखालील मुलांच्या गटातील पहिल्या सामन्यात जी जी चिटणीस शाळेने ओरिएंटल शाळेचा 1-0 असा पराभव केला, दुसऱ्या सामन्यात संत मीरा शाळेने मुक्तांगण शाळेचा 2-0 असा पराभव केला, तिसऱ्या सामन्यात गोमटेश शाळेने एम आर भंडारी शाळेचा 2-0 असा पराभव केला, चौथ्या सामन्यात व्ही एम शानभाग शाळेने प्रेशियस ब्लाजम शाळेचा 2-0 असा पराभव केला, पाचव्या सामन्यात प्रेझेंट कॉन्व्हेंटच्या शाळेने भारती विद्या भवन शाळेचा 1-0 असा पराभव केला, सहाव्या सामन्यात गोमटेश शाळेने एम व्ही हेरवाडकर शाळेचा पेनल्टी शूटआऊटवर 8-7 असा पराभव केला, सातव्या सामन्यात संत शाळेने व्ही एम शानभाग शाळेचा 1-0 असा पराभव केला, तर आठव्या सामन्यात केएलएस शाळेने प्रेझेंट कॉन्व्हेंट शाळेचा 3-0 असा पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
सकाळी स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे माजी उपमहापौर आनंद चव्हाण, गोमटेश स्कूल मजगांवचे मुख्याध्यापक महातेश हिरेमठ, प्रशासक प्रदीप पाटील, बापू देसाई, दयानंद बजंत्री, प्रविण पाटील उमेश मजुकर, रामलिंग परीट, अर्जुन भेकने, चंद्रकांत पाटील, कौशीक पाटील, यश सुतार, किरण तरळेकर, जयसिंग धनाजी, संतोष दळवी, हणंमत अडोनी या मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंची ओळख व फुटबॉल चेंडूला किक मारून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
मंगळवार ता. 12 रोजी सकाळी पहिला उपांत्य सामना जी जी चिटणीस वि. गोमटेश स्कूल सकाळी 9.00 वाजता दुसरा उपांत्य सामना संत मीरा वि. केएलएस सकाळी 10.00 वाजता त्यानंतर मुलींच्या फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *